ग्रामीण व दुर्गम भागातील कोरोना चाचणी साठी मोबाईल मेडिकल युनिट वाहन सुरु

vlcsnap 2021 05 21 12h32m51s663

ग्रामीण व दुर्गम भागातील कोरोना चाचणी साठी मोबाईल मेडिकल युनिट वाहन सुरु

अकोला : कोरोनाची चाचणी व त्यावर मात करण्यासाठी जी.प. आरोग्य विभागाचा भर देत आज पासून ग्रामीण आणि दुर्गम भागासाठी कोरोना टेस्टिंग मोबाईल मेडिकल युनिट वाहन सुरु करण्यात आले आहे या वाहनाद्वारे ग्रामीण व दुर्गम भागातील कोरोना चाचण्या करण्यात येणार आहेत.याचे उदघाटन आज जी.प. अध्यक्ष यांनी केलंय.

    कोरोनाची चाचणी करण्यासाठी ज्या ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना सुविधा देण्यात जिल्हा परिषद आरोग्य विभागाला अडचण येत आहे तिथे आता हे जिल्हापरिषदेचे आरोग्य विभागाचे मोबाईल युनिट वाहन पोहचणार आहे, शासनाकडून उपलब्ध झालेल्या नेशनल मेडिकल मोबाइल यूनिट अँब्युलन्स सोबत वैद्यकीय अधिकारी ,फॉर्मासिस्ट, मेडिकल टेक्निशियन, स्टाफ नर्स आणि चालक आहे.आवश्यक ठिकाणी सूचना मिळताच अँब्युलन्स तात्काळ तिथे जाऊन नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविणार आहे.कोरोना चाचणीसाठी सर्व सुविधायुक्त या वाहनाचे आज जी.प. अध्यक्ष भोजने यांनी उदघाटन केलं असून गंभीर आजारी असणाऱ्या नागरिकांना दवाखान्यात भरती करण्यात येणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेश असोले यांनी सांगितले.

लिज पट्टे देण्याच्या जबाबदारीमुळे घरकुलांचे बांधकाम आता नगररचना विभागावर अवलंबून

राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले ताली-थाली बजाव आंदोलन

२९०३ अहवाल प्राप्त, ५०३ पॉझिटीव्ह, ५४६ डिस्चार्ज,१८ मृत्यू

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social media & sharing icons powered by UltimatelySocial
WhatsApp5k
100