परदेशी जाणा-या नागरिकांसाठी रविवारी कोव्‍हीड लसीकरणासाठी विशेष सत्रचे आयोजन.;’ महापौर सौ.अर्चना जयंत मसने.

covaksin

परदेशी जाणा-या नागरिकांसाठी रविवारी कोव्‍हीड लसीकरणासाठी विशेष सत्रचे आयोजन.;’ महापौर सौ.अर्चना जयंत मसने.

अकोला दि. १० जुन 2021 – अकोला महानगरपालिका क्षेत्रातील परदेशात जाणा-या विद्यार्थ्‍यांकरिता व परदेशात वास्‍तव्‍य करणा-या विद्यार्थ्‍यांसाठी तसेच नागरिकांसाठी याचसोबत आंतर्राष्‍ट्रीय खेळांकरिता निवड झालेल्‍या खेळाळू यांच्‍या करिता विशेष सत्र राबवून लसीकरण करण्‍यासाठी महापौर सौ.अर्चना जयंत मसने यांनी पत्र दिले होते त्‍या अनुषंगाने मनपा प्रशासनाव्‍दारे रविवार दि. 13/06/2021 रोजी टिळक रोडवरील किसनीबाई भरतीया रुग्‍णालय येथे सकाळी 9 ते 11 वाजे दरम्‍यान विशेष लसीकरण सत्राचे आयोजन करण्‍यात आले आहे. यासाठी विदेशात जाण्‍यासाठी लागणारे कागदपत्रे सोबत आणून अपॉईन्‍मेंट घेउन लस घेणे किंवा एक दिवस आगोदर 12 जून रोजी मुख्‍य पोस्‍ट ऑफीस बाजुला मनपाच्‍या आर.सी.एच. कार्यालय येथे जाउन मनपा कर्मचारी नाईकवाडे व अग्रवाल यांच्‍याकडे सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत कागदपत्रे पडताळणी करून आपली अपॉईन्‍मेंट निश्‍चीत करून लसीकरण मोहीमेचा लाभ घेण्‍याचे आवाहन महापौर सौ.अर्चना जयंत मसने यांनी केले आहे.

दिव्यांग लाभार्थ्यांना विवाहाकरिता आर्थिक सहाय्य अनुदानाचे वितरण

ऑटो चालकाचा प्रामाणिकपणा, गरीब शेतकऱ्याचे महत्वाचे कागदपत्रे व कपडे असलेली पिशवी केली परत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social media & sharing icons powered by UltimatelySocial
WhatsApp5k
100