मनपाच्या प्रवेशद्वारामध्ये नाल्यातील घाण टाकून सेनेने केलं आंदोलन

IMG20210610130138

मनपाच्या प्रवेशद्वारामध्ये नाल्यातील घाण टाकून सेनेने केलं आंदोलन

 अकोला : मनपाच्या सत्ताधाऱ्यांनी पावसाळ्यापूर्वी शहरातील नाले सफाई कडे दुर्लक्ष केल्याने नाला सफाई चे कामे झाली नसल्याचा आरोप करीत त्या विरोधात शिवसेना आक्रमक होत  महापालिकेच्या प्रवेशद्वारामध्ये जलकुंभी व नाल्यातील घाण टाकून सत्ताधाऱ्यांचा निषेध करीत आंदोलन केलंय.

 दरवर्षी मान्सुनपूर्व नाला सफाईची कामे साधारणपणे पावसाळा सुरु होण्याच्या ४५ दिवस आधी केली जातात.जेणे करुन शहरातील वाहणार्या मोठ्या नाल्यातील पाणी रस्त्यावर न साचता अथवा सखल भागात न साचता वाहून जावे. हे काम पावसाळा सुरु होण्यापूर्वी ४५ दिवस आधी करावे लागत असताना दरवर्षी नाला सफाईच्या कामाला विलंब केला जातो.यावर्षीही नाला सफाईकडे सत्ताधाऱ्यांनी विलंब केल्याचा आरोप सेनेने केला, नाला सफाईकडे दुर्लक्ष केल्याने शहरातील नाले सफाई न झाल्याने, पहिल्याच पावसाच्या पाण्याने तुंबून भरल्याने गटाराचे पाणी शहराच्या अनेक भागातील घरामध्ये शिरले, याचा निषेध करत शिवसेनेने आक्रमक होत,अकोला महापालिकेच्या प्रवेशद्वारावर शहरातील नाल्यातील घाण आणि जलकुंभी आणून टाकली. यावेळी अकोला महापालिकेत सतेत असलेल्या भाजप विरोधात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार नारेबाजी करत महापालिकेचा निषेध केला. आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्या गेलं तर या फेक्ष्या ही तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

एसीबीच्या जाळ्यात ठाणेदार रायटर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social media & sharing icons powered by UltimatelySocial
WhatsApp5k
100