युवतीने नोकरी सोडून केला लाकडी तेल घाणा व्यवसाय सुरू

अकोट शहरातील सरस्वती नगरातील युवतीने नोकरी सोडून जनतेचे आरोग्य चांगले कसे राहील

0
23

IMG 20210313 WA0116

अकोट तालुका प्रतिनिधी:-संजय सपकाळ:-9767723794

अकोट : अकोट शहरातील सरस्वती नगरातील युवतीने नोकरी सोडून जनतेचे आरोग्य चांगले कसे राहील व आपणास जनतेची सेवा कशी करता येईल यासाठी रक्षा लाकडी तेल घाणा सुरू करून एक प्रसिद्ध उद्योगपती बनण्याची सदर युवतिची इच्छा आहे अकोट शहरातील अशोकराव चौधरी यांची मुलगी कांचन चौधरी या युवतीने एमबीए कृषी मध्ये करून सदर युवती कृषी विभागात नोकरीला लागली असताना सदर युवतीने नोकरी नाकारून व्यवसाय करून लोकांची सेवा करून एक उद्योजिका होऊन जनतेचे आरोग्य कसे चांगले व निरोगी राहील यादृष्टीने लाकडी घाण्यावरील तेल उद्योग सुरू केला सध्या परिस्थिती रिफाईन्ड तेल खाऊन अनेक लोक आजारी पडत आहेत सोयाबीन तेल स्वस्त असल्यामुळे सर्व लोक त्या कडे आकर्षित होऊन तेल खात आहेत परंतु त्याचे साईड इफेक्ट भरपूर प्रमाणात आहेत त्यामुळे घाण्याचे तेल शुद्ध असून ते आरोग्यास हानिकारक नाही तसेच लाकडी घाण्याचे तेल कोणते प्रकारचे केमिकल अथवा कोणत्याही प्रकारचे हानिकारक पदार्थ टाकण्यात येत नाही सदर लाकडी तेल घान्यात जवस, करडई,सूर्यफूल, बदाम, खोबरे, सरसो, तिळ,याचे तेल काढण्यात येतात तर शेंगदाणा एक लिटर तेल काढन्याकरीता अडीच किलो शेंगदाणे लागतात तर शेंगदाणा मार्केटमध्ये 120 रुपये किलो आहे तर ते 160 रुपये कसे असा प्रश्न उपस्थित होतो गृह उद्योग मध्ये सर्वच पारंपरिक व नैसर्गिक खाद्य पदार्थ आहेत जसे गूळ मुखवास अनेक पदार्थ असून या पासून जनतेचे आरोग्य चांगले कसे राहील व जनता निरोगी कशी राहील याकडे विशेष लक्ष देऊन एक उद्योजिका होऊन कांचन चौधरीला समाजाची सेवा या माध्यमातून करायचे आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here