shetkri 1

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना “नाम फाऊंडेशन” तर्फे प्रत्येकी 15 हजारांची मदत.

अकोला :  पातूर तालुक्यातील आस्टूल येथील  भास्कर त्रंबक इंगळे (42) या अल्पभूधारक युवा शेतकऱ्याने सततची नापिकी व शेतीसाठी घेतलेल्या कर्जाच्या विवंचनेतून आपल्या शेतात विष प्राशन करून आत्महत्या केली होती. तसेच सस्ती येथील 41 वर्षीय संदीप हिरामन शेळके या युवा शेतकऱ्याने सततची नापिकी, करोनामुळे लॉकडाऊनच्या काळात सर्व धंदे-मजुरी बंद असल्याने तसेच त्यांनी शेतीसाठी बँकेकडून कर्ज घेतले होते. त्यांना गेल्या अनेक वर्षांपासून शेतीत अपेक्षित यश मिळत नसल्यामुळे लागणारा खर्च व त्यातून मिळणारे तुटपुंजे उत्पन्न यामुळे आलेला कर्जबाजारीपणा यामुळे हे कर्ज कसे फेडावे या चिंतेतूमुळे त्यांनी आपली जीवनयात्रा संपविली.

त्यानिमित्ताने शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या व नटसम्राट नाना पाटेकर व आदर्श अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी स्थापन केलेल्या “नाम फाउंडेशन” या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबाला सानुग्रह मदत म्हणून 15  हजार रुपयांचा धनादेश त्यांची विधवा पत्नी श्रीमती आरती भास्कर इंगळे व श्रीमती वैशाली संदीप शेळके यांना देण्यात आला. ही मदत नाम फाउंडेशन चे विदर्भ व खानदेश चे समन्वयक हरीश इथापे यांच्या मार्गदर्शनात व नाम फाउंडेशन चे जिल्हा समन्वयक माणिक शेळके यांच्या हस्ते देण्यात आली.

shetkri 2

आतापर्यंत नाम फाउंडेशनने विदर्भ व मराठवाडा या भागात आठ गावे दत्तक घेतली असून अनेक जिल्ह्यांमध्ये जलसंधारण, तलाव खोलीकरण, नद्यांमधील गाळ उपसणे अशी अनेक समाजोपयोगी कामे लोकसहभागातून केली आहे तर आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील विधवा महिलांना सानुग्रह मदत म्हणून पंधरा हजार रुपये नाम फाउंडेशन च्या वतीने देण्यात येते अथवा या कुटुंबातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांना शिलाई मशीन, शेळ्या व इतर रोजगाराचे साहित्य मदत म्हणून देण्यात येते. आतापर्यंत अकोला जिल्ह्यातील 40 शेतकरी आत्महत्याग्रस्त विधवा महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले असून 28 कुटुंबांना पंधरा हजार रुपयांचे धनादेश वितरीत करण्यात आले आहेत.

ही मदत देतावेळी नाम फाउंडेशन चे समन्वयक मंगेश गोळे, सस्ती येथील प्रतिष्ठित अरविंदजी महाले, अरुण बदरखे, अरविंद शेळके, मुरलीधर बदरखे, संजय शेळके, पवन शेळके, आदी मान्यवर उपस्थित होते.

दुधाळ जनावरे वितरणासाठी आणखी ३० लाभार्थ्यांची निवड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here