अकोट तालुक्यात हिरव्यागार झाडांची कत्तल

WhatsApp Image 2021 03 15 at 5.24.38 PM 1 WhatsApp Image 2021 03 15 at 5.24.38 PM

घटनास्थळी वन विभागाचे अधिकारी पोहोचतात रान कसायांनी काढला पळ

अकोट तालुका प्रतिनिधी:-संजय सपकाळ:-9767723794

पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी एकीकडे शासन वृक्षलागवडीचे विविध योजना राबवून कोट्यावधी रुपये खर्च करीत आहे. दुसरीकडे वन व महसूल विभागाच्या दुर्लक्ष व हलगर्जीपणामुळे भर दिवसा मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड जोरत चालू आहे अकोट वनपरिक्षेत्रातील अकोट परिसरातील खानापूर भागातील लोहारी परिसरात एका शेतामध्ये दिनांक १३ मार्च रोजी वृक्षांची कत्तल करून त्यांची विल्हेवाट लावण्याचे समोर आले असता, परिसरातील एका शेताजवळ शेत शिवारात मोठमोठ्या तब्बल ३० ते ४० वर्षाची लिंबाचे झाडे जमीनदोस्त केले. त्यामध्ये सहा वर्ष जुनी झाडे जमीनदोस्त करण्यात आली,
वनविभागाचे अधिकारी येण्याचे समजताच वन कसायांनी ठिकाणावरुन पळ काढला. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी अजय बावणे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या टीमने घटनास्थळी धाव घेऊन तोडलेल्या वृक्षांचे पंचनामे करून कटाई केलेले वृक्ष तब्बल ३ ते ४घनमीटर चे २९ नग जप्त करण्यात आले. पुढील तपास वन परिक्षेत्र अधिकारी ए. एन. बावने वन प्रादेशिक
परिमंडळ अधिकारी अकोट यांचे मार्गदर्शनाखाली, एस.जी. जोंधळे वनरक्षक शहानूर बिट आकोट, एस. जी. रेळे ऑपरेटर, विकास मोरे, दीपक मेसरे अधिकारी तपास करित आहेत

ज्या परिसरात वृक्षतोड होत असेल तर त्या ठिकाणी पाहणी करून पंचनामा करुन कारवाई करण्यात येईल तसेच शेतकऱ्यांनी झाड विकू नये यासाठी जनजागृती करण्यात येईल.
ए.एन.बावने
वनपरिक्षेत्र, प्रादेशिक परिमंडळ अधिकारी अकोट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here