मुडंगाव शेत शिवारात एका हरणा सह 9 बकऱ्याचा विषारी पाणी पिल्याने मृत्यु 

अकोट तालुका प्रतिनिधी:-संजय सपकाळ:-9767723794

WhatsApp Image 2021 03 16 at 9.18.48 PM 1 WhatsApp Image 2021 03 16 at 9.18.48 PM
अकोट : अकोट तालुक्यातील मुडगांव शेत शिवारात खानापूर जवळ असलेल्या मुरलीधर फुसे यांच्या शेताजवळ कोण्या तरी अदन्यात व्यक्तीने लहान खड्डा करून त्यात विषारी औषध टाकून ते पाणी एका हरणा सह ९ बकऱ्यानी पिल्याने हरिण व बकरया मरण पावल्या यावेळी बकऱ्याच्या मालकांनी सदरची घटना 100 नंबर वर फोन लाऊन घटना सांगितली घटनास्थळी अकोट ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलीस दाखल झाले परंतु चार तासापर्यंत वन विभागाचे कर्मचारी व अधिकारी दाखल झाले नव्हते अखेर संध्याकाळी पाचच्या सुमारास हरणाचा पंचनामा वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला तर तीन तास अगोदर बकऱ्यांचा पंचनामा ग्रामीण पोलीस बीट जमादार मनोज कोल्हटकर पोका भाष्कर सांगळे यांनी केला.

सर्तकतेचा इशारा कडकडाटासह मेघगर्जना होण्याची शक्यता

बकऱ्या व हरीण मुंडगाव येथे पी.एम.करिता नेण्यात आले सदर बकऱ्या मुंडगाव येथील राजू सरकटे, अशोक नवलकार, भास्कर बिलेवार, दीपक धांडे यांचे असून सदर गरीब लोकांचे 1लाख 50 हजार रुपयाचे जवळपास नुकसान झाले असल्याचे प्रथम दर्शनी सांगण्यात आले सदर खड्डा हरणाची शिकार करण्याच्या उद्देशाने केला असल्याचे समजते असेच अनेक खड्डे या परिसरात आढळून आले आहेत परिसरात हरणाची शिकार सुरू असल्याची चर्चा जोरात चालू होती सदर हरणाची शिकार करणारे विषारी औषध टाकून पळून गेल्याचे बकरा चारणाऱ्यांनी सांगितले तसेच याच खड्ड्यातून हरीण पाणी पिऊन गेले व नंतर बकऱ्या पाणी पिल्याने ते मरण पावल्या पुढील तपास अकोट ग्रामीण पोलीस व वन विभाग करीत आहे हरणाची शिकार करणाऱ्यांवर वन विभागाचे अधिकारी या शिकार करणाऱ्यांना जेरबंद करतात किंवा नाही याकडे अकोट तालुक्यातील व मुडंगाव परिसरातील जनतेचे लक्ष लागले आहे सदर वृत्त लिहिस्तोवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

परिक्षा शिकवणी वर्ग तसेच व्यायामशाळा सुरु करण्यास सशर्त परवानगी

अकोट तालुक्यात हिरव्यागार झाडांची कत्तल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here