एमपीएससीची परीक्षा, प्रतिबंधात्मक आदेश लागू

    महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा परिक्षा रविवारी २१ मार्च रोजी जिल्ह्यातील १८ उपकेंद्रावर सकाळी १० ते १२ व दुपारी तीन ते पाच या वेळेत होणार आहे. त्या अनुषंगाने परीक्षा शांततेत पार पाडण्याकरिता रविवारी २१ मार्चचे सकाळी सहा ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत परीक्षा केंद्राच्या आतील संपूर्ण परिसरात व केंद्राचे बाहेरील लागून असलेल्या १०० मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी निर्गमित केले आहे.

महापालिकेचा फुलीवर सर्वोच्च न्यायालयाची यापूर्वीच फुली तो निर्णय रद्द करा…रश्मि देव यांची मागणी
शिवाजी आर्ट, कॉमर्स अँन्ड सायन्स कॉलेज मोर्णा बिल्डींग शिवाजी पार्क, श्रीमती राधादेवी गोयनका महिला महाविद्यालय, खंडेलवाल ज्ञानमंदिर कॉन्व्हेन्ट, सीताबाई कला महाविद्यालय, शिवाजी आर्ट, कॉमर्स अँन्ड सायन्स कॉलेज, श्री शिवाजी हायस्कूल मुख्य शाखा, दि.नोएल इंग्लिश हायस्कूल, कौलखेड रोड, भारत विद्यालय, जागृती विद्यालय व उच्च माध्य. विद्यालय, न्यु इंग्लिश हायस्कूल, ज्युबिली इंग्लिश हायस्कूल ज्युनिअर कॉलेज, मोहरीदेवी खंडेलवाल विद्यालय, भिकमचंद खंडेलवाल विद्यालय, होलीक्रॉस हायस्कूल, श्री शिवाजी विद्यालय, डि.ए.व्ही कॉन्व्हेन्ट, बी.आर. हायस्कूल या १८ ठिकाणी परीक्षा होणार आहे. परीक्षा केंद्राच्या परिसरात प्रवेश करतेवेळी पाच पेक्षा जास्त व्यक्ती प्रवेश करणार नाहीत, घोषणा देण्यात येणार नाहीत, परीक्षा केंद्रावर प्रवेश करणार्या सर्व परिक्षार्थी, अधिकारी, कर्मचार्यांचे थर्मल व इफ्रारेड थर्मामिटरव्दारे तापमान तपासण्यात यावे. परीक्षार्थी यांना मास्कचा वापरणे बंधनकारक राहील. मास्क शिवाय प्रवेश देण्यात येवू नये, परिक्षार्थीमध्ये किमान तीन फुटाचे अंतर राहिल अशी बैठक व्यवस्था असावी, परिक्षा केंद्राचे प्रवेशव्दारासमोर सॅनिटायझरची व्यवस्था असावि, परिसरात निर्जंतुकीकरण करण्यात यावे, कोणत्याही परिक्षार्थी, अधिकारी, कर्मचारी यांना कोव्हिड-१९ ची लक्षणे दिसून आल्यास रुग्णालयात भरती करावे. याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

ग्रामीण वीज कार्यालयात रिकाम्या खुर्चीला दिले निवेदन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here