पारळा गावातील भिंतीवर अवतरली पुस्तके

https://www.akolatimes.com/?p=275WhatsApp Image 2021 03 21 at 11.45.36 AM 1WhatsApp Image 2021 03 21 at 11.45.36 AM आज सकाळी ३४८ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह

कोरोनावर केली शिक्षकांनी मात 

अकोट तालुका प्रतिनिधी :-संजय सपकाळ :-9767723794

कोरोना या भयंकर आजारामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड शैक्षणिक नुकसान होत आहे त्याकरता विविध उपक्रम राबवले जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून अकोट तालुक्यातील पारळा येथे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला.
येथील शिक्षक प्रवीण बा.ठाकरे व श्यामकुमार अनकुरकर यांच्या संकल्पनेतून पाठ्यपुस्तकातील महत्त्वपूर्ण माहिती गावातील भिंतींवर लिहिण्यातआली. त्यामध्ये गणितातील सूत्रे, भौमितिक रचना, बैजिक राशी ,पाढा तयार करणे ,राष्ट्रीय प्रतिके, मराठी व्याकरण ,नागरिक शास्त्र ,अशा विविध विषयावरील बाबी त्यांनी स्वतः ठिकठिकाणी लिहिल्यात. त्यामुळे सहाजिकच गावातील विद्यार्थ्यांची दृष्टी त्यावर पडून त्यांच्या अध्ययनात अभ्यासात भर पडत आहे विद्यार्थ्यांबरोबर गावकऱ्यांच्या ज्ञानात सुद्धा भर पडत आहे. याकामात शाळेचे मुख्याध्यापक श्री दंदे सर व सहा.शिक्षक पळसपगार सर यांचे सुद्धा सहकार्य लाभत आहे. शिक्षकांनी राबविलेल्या उपक्रमांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे..

अंबाबरवा अभयारण्य पर्यटकांना झाले वाघाचे दर्शन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here