महाराष्ट्र आशा व गट प्रवर्तक फेडरेशनच्या वतीने करण्यात आले आवाहन 

                           !!27 मार्च रोजी एक दिवस शेतकरी भारत बंदची घोषणा!!

                         !! 27 मार्च भारत बंद आंदोलन यशस्वी करा !!

 

अकोट तालुका प्रतिनिधी:- संजयसपकाळ :-976772374

अखिल भारतीय संयुक्त कामगार कृती समितीने केलेल्या आवाहना नुसार मोदी सरकारच्या शेतकरी, शेतमजूर, कामगार कष्टकरी, योजना कर्मचारी, शासकीय व निम शासकीय कर्मचरीच्या कामगार विरोधी व खाजगीकरण विरोधी धोरणांच्या विरोधात दि 27 मार्च रोजी भारत बंद ची हाक दिली आहे, या भारत बंद आंदोलनात आपली संघटना देखील सहभागी होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) ने 2021 हे वर्ष आंतरराष्ट्रीय हेल्थ अँड केअर वर्कर्स वर्ष म्हणून घोषित केले आहे. त्यानुसार भारत सरकारने योजना कर्मचाऱ्यांमध्ये आशा सहित इतर सर्व योजना कर्मचाऱ्यांना कामगारांचा विशेष दर्जा देऊन त्यांना किमान वेतन लागू करावे तसेच PF व इतर सामाजिक सुरक्षा याबाबत ठोस पावले उचलून सर्व महिला कर्मचाऱ्यांचे कल्याण करावे. व त्यांनी कोरोना काळात केलेल्या कार्याचा गौरव करून एक नवीन आदर्श जगासमोर ठेवावा अशी अपेक्षा असताना सदर मोदी सरकार सर्व महिला कामगारांची इतर कामगार, कर्मचारी, शेतकरी, शेतमजूरांच्या सहित पिळवणूक करीत आहेत. सदर पिळवणुकीच्या विरोधात तसेच शेतकरी विरोधी तीन काळे कायदे व कामगार विरोधी चार संहिता रद्द करावे या प्रमुख मागण्या घेऊन सरकारवर दबाव आणण्यासाठी 27 मार्च रोजी एक दिवस शेतकरी भारत बंदची घोषणा केली आहे, या भारत बंद ला सर्व कामगार संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे, तर आपण आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या आशा व गटप्रवर्तकांनी जन सामान्यांचा हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या मोदी सरकारच्या विरोधात दि. 27 मार्च रोजीच्या भारत बंद मध्ये आपला सहभाग नोंदवून हे आंदोलन यशस्वी करूया या.असे आशा व गटपर्वतक युनियनचे
कॉ. सलीम पटेल राज्य महासचिव
कॉ. आनंदी अवघडे अध्यक्षा
कॉ.अर्चना धुरी कोषाध्यक्ष यांनीआव्हान केले आहे.

जमावबंदी व संचारबंदी चे आदेश ; जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर

1567 अहवाल प्राप्त, 288 पॉझिटिव्ह, 227 डिस्चार्ज, चार मयत

मोटर सायकलचा अपघात; एक ठार तर एक गंभीर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here