got bank

गोट बँक ऑफ कारखेडा क्रांती आणू पाहणारा प्रयोग

आतापर्यंत तुम्ही अनेक बँका पाहिल्यायेत. ब्लड बँक, वॉटर बँक, मिल्क बँक, बुक बँक, पैशांच्या बँक अशा एक ना अनेक बँका. पण, आम्ही तुम्हाला आता एक अफलातून बँक दाखविणार आहोत. राज्यासह देशाच्या ग्रामीण भागात अमुलाग्र आणि क्रांतीकारी बदल घडवू पाहणारी ही बँक आहेय अकोला जिल्ह्यात… नेमकं कशाची बँक आहेय ही?… कसं चालतं या बँकेचं काम… अशी अनेक प्रश्न तुम्हाला पडली असतीलच. मग चला, या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी जाऊयात अकोला जिल्ह्यातील या हटके बँकेत…

गोट बँक ऑफ कारखेडा…. होय गोट बँकच… तुम्हाला नवल वाटत असलेली ही बँक आहेय चक्क बकर्यांची… अन ही बँक आहेय अकोला जिल्ह्यातील सांगवी मोहाडी गावात… या बँकेत कर्जातही बकरीच मिळतेय… तुम्हाला व्याजही बकरीच्याच स्वरूपात भरावं लागतंय… अन तुम्हाला डिपॉझिटही अगदी बकरीच्याच स्वरूपात भरावं लागतंय. अन तुमच्या बकरीच्या डिपॉझिटवरचं व्याजही तुम्हाला अगदी बकरीच्याच स्वरूपात मिळतंय…. म्हणजेच सबकुछ बकरीच…. ही बँक ४ जुलै २०१८ मध्ये नरेश देशमुख यांनी अकोल्यात सुरू केलीय. देशमुख यांचं मुळगाव वाशीम जिल्ह्यातील मानोरा तालूक्यातलं कारखेडा… म्हणून बँकेचं नाव ठेवलंय गोट बँक ऑफ कारखेडा….

हे आहेय सांगवी मोहाडी गावातील उमेश ताले… पावणेदोन वर्षांपूर्वी उमेश यांनी श्गोट बँक ऑफ कारखेडा मधून स्वताच्या नावाने दोन बकर्यांचं कर्ज घेतलंय. उमेश यांची तेंव्हा नुकतीच ड्रायव्हरची नोकरी गेली होतीय. अन या अगदी कसोटीच्या काळात गोट बँक त्यांच्या मदतीला आलीय. आज बकरी पानातून उमेश लखपती झालेयेत. सध्या उमेश यांच्याकडे २२ बकर्या आहेत. तर त्यांना २० बकर्यांच्या विक्रीतून दोन ते सव्वादोन लाख मिळालेत. तर त्यांनी बँकेला व्याजाच्या स्वरूपात आठ बकर्या परतही केल्यायेत. आज कुटूंब आणि पती स्थिर झाल्यानं त्यांच्या पत्नीचा आनंदही अगदी शब्दांच्या पलीकडचा आहेय.

अशीच परिस्थिती आहेय आज गावात अंगणवाडी मदतनीस असलेल्या इंदूबाई माहोरे यांची… त्यांच्या एका बकरीच्या दोन वर्षांत आज अकरा बकर्या झाल्यायेत. बँकेच्या माध्यमातून आज गेल्या दोन वर्षांत गावात अनोखी समृद्धी आलीय. बँकेनं कर्जात दिलेल्या १६ बकर्यांच्या आज गावात दोनशेंवर बकर्या झाल्यायेत. म्हणजेच सव्वा लाखांच्या कर्जावर गावानं तब्बल १६ लाखांची कमाई केलीये. आता दररोज अनेक लोक बँकेची माहिती घ्यायला येथे येतायेत.

या गोट बँकेची क्षितीजं आता राज्य आणि देशाच्या सीमा ओलांडतांना दिसतायेत. या बँकेच्या शाखा स्थापन करण्यासाठी कर्नाटक, आंध्रप्रदेशासह नेपाळमधूनही विचारणा झालीये. महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी पालघरसह अकोला आणि अमरावती या तीन जिल्ह्यांत शेळी बॅंकेचा प्रायोगिक प्रकल्प राबवण्याचा निर्णय राज्य सरकारने केला आहेय. हा प्रायोगिक प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर राज्यातील सर्व जिल्ह्यांत शेळी बॅंक उपक्रम राबवण्याचा महिला व बालविकास विभागाचा मानस आहेय. माविम यासाठी महिला बचत गटांना १० लाखांचं कर्ज देणारेय. शेळी बँक उपक्रमासाठी राज्य सरकारच्या वतीने महिला आर्थिक विकास महामंडळ आणि कारखेडा कृषी उत्पादक कंपनी यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आलाये.

गोट बँक ऑफ कारखेडा हा ग्रामीण भागात क्रांती आणू पाहणारा प्रयोग आहेय. जोडधंदा नसल्यामुळे शेती व्यवसायाला लागलेल्या आत्महत्येच्या किडीवर रामबाण उपाय ठरू पाहणारा हा प्रयत्न आहेय. त्यामुळे या शाश्वत विकासाच्या श्मॉडेलश्ला अधिक लोकाभिमुख करीत सरकारनं ताकद देणं गरजेचं आहेय. यातून निश्चितच विकास आणि स्वयंपुर्णतेचं एक नवं पर्व ग्रामीण भागात सुरू होऊ शकतंय.

जुना भाजीबाजारात फरसाणच्या दुकानांना आग…

जमावबंदी व संचारबंदी चे आदेश ; जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here