vanchit

वरिष्ठ अधिकाऱ्यांना सह आरोपी करण्याची वंचितचि मागणी

अकोला : अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या वनपरीक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून वरिष्ठ अधिका – यांना सहआरोपी करण्याच्या मागणीचे निवेदन वंचित बहुजन महिला आघाडी च्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री , महाराष्ट्र राज्य , मुंबई यांना पाठविण्यात आले.

      अमरावती जिल्ह्यातील मेळपाट व्याघ्र प्रकल्पाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली . त्यांच्या सुसाईड नोटमध्ये वनसंरक्षक विनोद शिवकुमार यांनी दिलेल्या त्रासामुळे आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे . त्यांनी लिहिलेल्या चार पानांच्या पत्रात त्या आत्महत्या का करत आहेत याबाबत सविस्तर लिहून दिले आहे . असे असले तरी विनोद शिवकुमारची अनेकदा तक्रार करूनही त्याचेवर वरिष्ठ अधिकारी एम एस रेड्डी यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही , त्याला पाठीशी घातल्याने एम एस रेड्डी सुद्धा दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येला तितकेच जबाबदार आहेत.त्यामुळे त्यांना सुद्धा सहआरोपी करण्यात यावे. अशी मागणी वंचित बहुजन महिला आघाडी , अकोला जिल्हा च्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आलीय.

महिनाभरात जिल्ह्याबाहेरील ३६ कोरोना रुग्णांचा मृत्यू

महिनाभरात जिल्ह्याबाहेरील ३६ कोरोना रुग्णांचा मृत्यू

आर्थिक पॅकेज न देता पुन्हा लॉकडाउन लागू केला तर मोठ्या उद्रेकाचा सामना करावा लागेल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here