महिनाभरात जिल्ह्याबाहेरील ३६ कोरोना रुग्णांचा मृत्यू
अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात अकोला शेजारच्या बुलडाणा, अमरावती, वाशीम, हिंगोली व जळगाव जिल्ह्यातील रुग्णही कोरोनावर उपचार घेण्यासाठी येत आहेत. दरम्यान मार्च महिन्यात आतापर्यंत जिल्ह्याबाहेरील ३६ रुग्णांचा कोरोनावर उपचार घेताना मृत्यू झाल्याची वैद्यकीय सूत्रांची माहिती आहे.
अकोल्यासह शेजारच्या जिल्ह्यातही कोरोनाचा संसर्ग वाढत असून बाधित रुग्ण सर्वोपचार रुग्णालयात गंभीर अवस्थेत उपचारासाठी दाखल होत आहेत. यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे बुलडाणा जिल्हयातील खामगाव, शेगाव आणि त्यानंतर अमरावती, वाशीम आणि हिंगोली जिल्ह्यातील आहेत. मार्च महिन्यात २३ तारखेपर्यंत जिल्ह्याबाहेरील ३६ रूग्णांचा सर्वोपचारमध्ये मृत्यू झाला असून यामध्ये सर्वाधिक प्रमाण हे बुलडाणा जिल्ह्यातील आहे. दरम्यान, फेब्रुवारी महिन्यापासून सक्रिय झालेल्या कोरोनाच्या दुर्सया लाटेतील संसर्ग हा पहिल्या लाटेच्या तुलनेत वेगात पसरणारा आहे. अकोल्यासह शेजारच्या जिल्ह्यातही रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे तेथील रुग्णालयातून अनेक रुग्णांना सर्वोपचारमध्ये संदर्भित करण्यात येत आहे. बहुतांश रुग्ण हे किरोनाची लागण होऊन आठ ते बारा दिवसांनंतर उपचारासाठी दाखल होत असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येते. सर्वोपचारमध्ये एकूण ३७० मृत्यू झाले असून त्यातील १७० जण अकोला जिल्ह्याबाहेरील आहेत. दरम्यान, सर्वोपचारमध्ये झालेले जिल्हानिहाय मृत्यू पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून
सर्वोपचारमध्ये झालेले जिल्हानिहाय मृत्यू
अकोला शहर – २३
अकोला ग्रामीण – २४
बुलडाणा – २३
वाशीम – ०८
अमरावती – ०२
हिंगोली – ०१
जळगाव – ०२
वरिष्ठ अधिकाऱ्यांना सह आरोपी करण्याची वंचितचि मागणी
आर्थिक पॅकेज न देता पुन्हा लॉकडाउन लागू केला तर मोठ्या उद्रेकाचा सामना करावा लागेल