lcb

शेतकर्यास लुटणार्या दोघांना ठोकल्या बेड्या

शेतकर्यास लुटणार्या आरोपींना अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले. लुटीची घटना शनिवारी रात्री पातूर रोडवर घडली होती.

मळसूर येथील शेतकरी विलास यशवंत काळे यांनी एक लाख रुपये लुटल्याची तक्रार २७ मार्च नोंदवली पातूर पोलिस ठाण्यात नांदिवली होती. ते दुचाकीने अकोला येथून कृषी उत्पन्न बाजार येथून हरबरा विक्रीचे नगदी पैसे घेवून गावी परत जात होते. एका अनोळखी इसमाने त्यांना पेट्रोल संपल्याचा बहाना करून पेट्रोल पंपापर्यंत गाडीवर येऊ देण्याची विनंती केली. त्याला मोटारसायकलवर बसवले. मात्र आरोपीने नांदखेड फाटा येथे मोटरसायकल थांबवून चाकूचा धाक दाखवत काळे यांच्या खिशातून एक लाख रुपये बळजबरीने हिसकावून पळ काढला होता. आरोपीसोबत त्याचा साथीदारही होता. अखेर पाेिलसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवत आरोपींना अटक केली. ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शैलेश सपकाळ यांनी केली. दरम्यान, लुटमारीच्या तपासाची जबाबदारी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या पथकाकडे सोपवली. त मंगळवारी पथकाने वाशीम येथील राम मंदिर परिसरातून विजय भोलाप्रसाद गुप्ता व लखन अरूण गवळी या दोघांना ताब्यात घेतले. आरोपींकडून एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच मोटरसायकल व एक मोबाईल फोनही जप्त केला. पुढील तपासासाठी आरोपी पातूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here