shabari yljna ghrkul

शबरी आवास योजनेचा लाभ द्या !

अकोला : नवेगांव येथील पंचायत समिती सभापती पातूर यांच्या नातेवाईकांची निवड शबरी आवास योजनेमध्ये केल्याने या योजनेचे पीडब्लूएल प्रतीक्षा यादीनुसार अनुक्रमाने लाभार्थींची निवड झाली नसल्याचा आरोप करीत याबाबत योग्य कारवाई करून न्याय मागण्याकरिता येथील गावकऱ्यांनी जिल्हापरिषदेसमोर धरणे आंदोलन केलंय.

नातेवाईकांना घरकुलांचा घरकुलाचा लाभ देण्यासाठी पंचायत समिती पातूरच्या सभापतींनी पीडब्ल्यूएल प्रतीक्षा यादीनुसार लाभार्थ्यांची निवड केली नाही प्रतीक्षा यादीला डावलून अनुक्रमांक २२६ , १३७ , १३६ , ९ ६ , ९ ० व ८७ यांना घरकुलांचा लाभ देण्यात आला . त्यामुळे पंचायत समिती पातूर यांच्यावर योग्य कारवाई करण्यात यावी व घरकुलांचा लाभ देण्यात यावा , या मागणीसाठी शबरी आवास योजनेपासून वंचित असलेल्या लाभार्थ्यांनी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन केलेय . त्यासोबतच सदर मागणीचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी येऊन यांना देण्यात आले आहे. आंदोलनात आहेत लक्ष्मण गिल्हे , गजानन भोकरे , वसंता . तंत्रज्ञान ससाने , रूस्तम ससाने , सुभाष डाखोरे यांना सहभाग घेतला .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here