अमरावती परिक्षेत्रातून अकोला पोलिस प्रथम!
अकोला : राज्यात पोलिस आयुक्तालय तसेच प्रत्येक जिल्ह्यातील पोलिस प्रशासनाच्या कामगिरीचा आढावा घेऊन त्यांचे कामकाज कशाप्रकारे आहे. यासाठी करण्यात आलेल्या मुल्यांकनामध्ये अमरावती परिक्षेत्रातील पाच जिल्ह्यातील पोलिसांमध्ये अकोला पोलिस प्रथम क्रमांकावर आलाय..
या स्पर्धेसाठी अकोला पोलिसांची प्रथमच निवड झाल्याने अकोला पोलिसांची कामगिरी अमरावती परिक्षेत्रात गौरवास्पद ठरली असल्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना म्हणालेत….
प्रशासकीय कामकाज, विविध गुन्ह्यातील तपास, प्रतिबंधात्मक कारवाया, गुन्हे नियंत्रण, शोधमोहीम, एमपीडीए, मकोका यासह विविध स्तरावर पोलिसांची कामगिरी कशाप्रकारे आहे… यासाठी मूल्यांकन घेण्यात आले. या मुल्यांकनामध्ये अकोला पोलिसांची कामगिरी अमरावती परिक्षेत्रातील अमरावती ग्रामीण, अमरावती आयुक्तालय, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशीम या पाच जिल्ह्यातून अव्वल ठरलीय.. अकोल्याचे पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या नेतृत्वात अकोला पोलिसांच्या नावावर अनेक उपक्रमांची दखल घेण्यात आली आहे. हे विशेष..
शेतकर्यास लुटणार्या दोघांना ठोकल्या बेड्या