f
डॉक्टर्स आणि कर्मचार्यांना दोहेरी संकटाचा सामना
विदर्भात सध्या उन्हाचा पारा चढलाय, वाढती कोरोना रुग्णांची संख्या आणि वाढता तापमानामुळे कोविड रुग्णालयात सेवा देणार्या डॉक्टर्स आणि कर्मचार्यांना दोहेरी संकटाचा सामना करावा लागत आहेय..

             अकोला जिल्ह्यात कोविड रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे आणि त्यामुळे पीपीईकीटचाही वापर वाढला आहेय. मात्र, या कीटचा अनेक आरोग्य कर्मचार्यांना त्रास सहन करावा लागतोय..पारा वाढल्याने पीपीई किट परिधान करणार्या आरोग्य कर्मचार्यांना सहा ते सात तास प्यायला पाणीही मिळत नाही.. अशा परिस्थितीत या कर्मचार्यांना कोरोना नव्हे, तर पीपीई कीटच जीवघेणी ठरत आहेय..

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोविड रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहेय.. कोविड वॉर्डात रूग्णसेवा देणार्या प्रत्येक आरोग्य कर्मचार्यासह डॉक्टरांनाही सहा ते सात तास पीपीई किट परिधान करावी लागत आहेय त्यामुळे एकदा पीपीई कीट परिधान केल्यावर या कर्मचार्यांना पाणीदेखील पिणे शक्य होत नाही.दुसरीकडे जिल्ह्यातील तापमानात लक्षणीय वाढ झाल्याने उकाडा वाढला आहे..सध्या जिल्ह्याचा तापमान ४१ अंश सेल्सिअस वर पोहचला आहेय..पीपीई किटचे कापड प्लास्टिकच्या आवरणाने आच्छादलेले असल्याने त्यातून हवाही जात नाहीय.. त्यामुळे पीपीई किट परिधान करणार्या कर्मचार्यांना मोठ्या प्रमाणात घाम येणे, घशाला कोरड पडणे, हाता-पायाला व्रण येणे, चक्कर, फंगल इन्फेक्शनआदी समस्यांना समोरे जावे लागत आहेय..

पीपीई कीटबाबत आलेल्या तक्रारी….
१) कापडाचा थिकनेस जास्त आहे…
२) प्लास्टिक कोटेड असल्याने या कापडातून हवा, पाणीदेखील जातनाही.
३ ) त्याचा परिणाम आरोग्य कर्मचार्यांच्या आरोग्यावर होत आहे.
४) पीपीई किट परिधान केल्यानंतर घाम येणे, घशाला कोरड पडणे यासह चक्कर येणे यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here