pkshi

पक्ष्यांची संख्या वाढीव, संरक्षणासाठी एक नवीन प्रयोग

            पक्ष्यांची संख्या वाढीव आणि त्यांच्या संरक्षणासाठी अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा अभयारण्यातील अधकार्यांनी एक नवीन प्रयोग केला आहेय.. हा प्रयोग यशशवी असून पक्ष्यांच्या संख्येत या भागात मोठी वाढसुद्धा झाली आहेय..

 नजर पोहचे पर्यंत पाणीच पाणी ,पक्ष्यांचा किलबिलाट आणि उन्हाळ्यात हा थंडगार वारा हे दृश्य आहेत अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा अभयारण्यातील… काटेपूर्णा जलाशयात विविध जातींच्या पक्ष्यांचा अधिवास आहे इथे अनेक पक्षी घरटी करून स्वच्छंदीपणे राहत आहेत …पाणपक्ष्यांच्या संवर्धनाकरिता 2018 ला या जलाशयात तीन बेट उभारण्यात आली.. साधारण हिवाळ्यातील डिसेंबर महिन्यात धरणाचे पाणी कमी झाल्यामुळे ही बेट उघडी पडतात..या उघड्या बेटाचा वापर म्हणून येथील वन अधिकार्यांनी या बेटाला आकार देऊन दुरुस्त केली.. परिणामी त्यावर पाणपक्षी ही आपली अंडी घालून पिलांना सुरक्षितपणे मोठे करू लागली..

2017 च्या पाहणीत असे जाणवले की पक्ष्यांना अंडी घालण्यासाठी जागा नसल्याने ती आपली अंडी धरण्याच्या किनार्यावर घालत होती,त्यामुळे किनार्यावर जंगली प्राणी, श्वापद त्यांची अंडी नष्ट करीत होती.. याकरिता काटेपूर्णा अभयारण्यात मातीची बेट उभारण्यात आली आहे, त्यामुळे आता या बेटांवर पक्षांची कॉलनी गजबजली आहे.. दरम्यान 2019 ला पाणपक्ष्यांसाठी चार नवीन बेट उभारण्यात आले त्यामुळे रिवर टन व सोबतच अनेक छोटे पाणपक्षी येथे येऊन त्यांनी आपली घरटी बांधण्यात सुरुवात केली…आणि आता बघता बघता पक्ष्यांच्या संख्येत इथे मोठी वाढ झाली आहेय..

आता वनविभागाने शिकारी पक्षानं करिता वाढलेली झाडे जलाशयात लावण्यास सुरुवात केली आहेय, त्यामुळे पक्षां करिता खाद्याची व्यवस्था ही झाली आहेय..येथे पर्यटनकरिता शासकीय बोटीने फिरताना पर्यटकांना या पक्ष्यांचे हमखास दर्शन होते व हौशी पर्यटक हे नयन रम्य दृश्य पाहून सुखावतात..काटेपूर्णा अभयारण्यात पक्षांच्या एकूण 123 प्रजाती आहेत त्याच स्थलांतरित पक्ष्यांच्या 27 प्रजाती आढळतात.. आतापर्यंत काटेपूर्णा अभयारण्यात सात कुत्रिम बेटांची निर्मिती करण्यात आली आहेय ..या बेटावर नदी सुरय , छोटा पांडा , भिंगरी यासारखे पक्षी आपले घरटे बांधून अंडी घालतात..सध्या हे स्थळ पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहेय..

अनेक दुर्मिळ पक्ष्यांचा वावर या अभयारण्यात असल्याने या अभयारण्याकडे पक्षी अभ्यारण या दृष्टिकोनातून बघणे व पुढची काळजी घेणे गरजेचे आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here