भागवत सप्ताहातील माळकरी संरक्षक भिंतीची करणार उभारणी

लोहारी गावचा अनोखा उपक्रमhttp://www.akolatimes.com/?p=422

WhatsApp Image 2021 04 02 at 7.20.59 PM 1 WhatsApp Image 2021 04 02 at 7.20.59 PM 2 WhatsApp Image 2021 04 02 at 7.20.59 PM

अकोट तालुका प्रतिनिधी:- संजय सपकाळ :-9767723794

लोहारी येथील गावकरी श्रीमद भागवत सप्ताहाचे ऐवजी गावालगत असणाऱ्या चंद्रिका नदीवर संरक्षक भिंतीची उभारणी श्रमदानातून करणार आहेत.

लोहारी खु. येथे दरवर्षी एकनाथ षष्ठीनिमित्त श्रीमद् भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात येत असते. परंतु यावर्षी कोरोना आजारामुळे शासनाच्या आदेशान्वये सर्व धार्मिक, सामाजिक कार्यक्रमावर बंदी घालण्यात आलेली आहे. त्यामुळे भागवत सप्ताह मोठ्या प्रमाणात साजरा न करता त्याऐवजी चंद्रिका नदीलगत संरक्षक भिंत उभारण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला. त्यानुसार संपूर्ण सप्ताहादरम्यान समस्त गावकरी श्रमदानातून नदीलगत ताराची जाळी व मातीचा भराव घालून सुमारे 800 मीटर लांबीची भिंत उभारणार आहेत.
गेल्या अनेक वर्षापासून लोहारी गावाला नदीच्या पुराचा सातत्याने धोका आहे. शासन दरबारी संरक्षक भिंतीची वारंवार मागणी करण्यात आली परंतु तब्बल एक कोटी रुपये पर्यंत निधीची गरज असताना शासनाकडून मात्र निधीची पूर्तता होत नाही. दरवर्षी पुरामुळे श्री हनुमान मंदिराचा परिसर वाहून जात आहे.
आज कथा प्रवक्ते ह.भ.प. रामकृष्ण महाराज अंबुसकर, प्रदीप किसनराव सपकाळ सरपंच
लोहारी यांच्या हस्ते नदीचे पूजन करून कामाचा शुभारंभ करण्यात आला. यादरम्यान शिवप्रेमी ग्रुप लोहारी, आत्मीयता कल्याण मित्र संघ चिंचखेड, जय भिम मित्र मंडळ लोहारी चे सर्व सदस्य व समस्त गावकरी उपस्थित होते यावेळी माळकरयानसोबत श्रमदान करतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here