nivedan 14 epril
१४ एप्रिल रोजी अशोक वाटिका सुरु करण्याची मागणी

अकोला: महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या जयंतीनिमित्य अशोक वाटिका मध्ये १४ एप्रिल रोजी अभिवादन करिता परवानगी देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे,या बाबत चे निवेदन आज जिल्हाधिवकरी यांना देण्यात आले.

देशाचे प्रेरणास्थान महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांची १३० वि जयंती येणाऱ्या दिनांक १४ एप्रिल रोजी असून सद्यस्थिती कोरोना महामारीच्या आजारामुळे सर्वत्र संचारबंदी जमावबंदी लागू करण्यात आली आहे व परिस्थिती ची कल्पना अवगत असून मागील वर्षी सुद्धा कोरोना स्थिती मुळे जयंती उत्सव साजरा होऊ शकला नाही परंतु ह्या वर्षी सुद्धा परिस्थिती तीच आहे परंतु चालू वर्षांमध्ये अनेक राजकीय पक्षाचे विविध कार्यक्रम आंदोलन व इतर गोष्टी झाल्यात तेव्हा कुठे  हि प्रशासनाला कोरोना सदृश्य परिस्थिती दिसली नाही परंतु आता १४ एप्रिल हा आमच्या समस्त जनतेचा महत्वाचा दिवस असल्याने या दिवशी शासनाच्या दिलेल्या नियमानुसार आम्हीं काटेकोर पालन करून दर्शनासाठी अशोक वाटिका एका दिवसासाठी खुली करण्याची मागणी संपूर्ण जिल्ह्यतील जनतेच्या वतीने निवेदना द्वारे जिल्हाधिकारी यांना करण्यात आलीय. या वेळी विश्वशांती बुद्ध विहार कवाडे नगर ,धम्म मैत्री बुद्ध विहार ,जेतवान नगर बुद्ध विहार मैत्री बुद्ध विहार ,श्रावस्थी बुद्ध विहार महात्मा फुले नगर ,नागसेन बुद्ध विहार मैत्री मंडळ, समता सैनिक बुद्ध विहार कैलास टेकडी ,समता संघ शास्त्री नगर छत्रपती शिवाजी चौक ,त्रिरत्न बुद्ध विहार न्यू रमेश नगर ,द ग्रेट सम्राट अशोक संघ रेणुका नगर तथागत बौद्ध विहार रमेश नगर ,विशाखा विहार भीम नगर अजंठा विहार भीम नगर संघमित्रा राव नगर डबकी रोड आदींनी निवेदन दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here