mnpa

नियमांचे उल्‍लंघन केल्‍यामुळे सुर्यचंद्र हॉस्‍पीटलला मुंबई नर्सींग अॅक्‍ट अन्‍वये रजिस्‍ट्रेशन रद्द करणेसंदर्भात मनपा आयुक्‍त यांनी दिली नोटीस.

अकोला दि. 10 एप्रील 2021 – अकोला महानगरपालिका क्षेत्रामध्‍ये गांधी चौक येथे स्थित सुर्यचंद्र ट्रामाकेअर अॅण्‍ड मलटी स्‍पेशालिटी हॉस्‍पीटल येथे मनपा आयुक्‍त यांनी 31 मार्च रोजी Bombay Nursing Homes Registration Act, 1949 च्‍या नियम 9 नुसार भेट देउन पाहणी केली असता रूग्‍णालयात कोव्‍हीड-19 पॉझिटीव्‍ह रुग्‍णा सोबतच एका कक्षात नॉन कोव्‍हीड रुग्‍णांना भरती करून त्‍यांच्‍यावर उपचार करीत असल्‍याचे निर्दशनास आले होते,

सदरची बाब नियमांचे उल्‍लंघन करणारी असून नॉन कोव्‍हीड रुग्‍णांच्‍या आरोग्‍यास व जिवीतेस हानी पोहोचविणारी होती. तसेच सुर्यचंद्र रुग्णालयात अत्यंत अस्वच्छता आढळुन आली तसेच वापरलेल्या पीपीई किट व इतर बायोमेडीकल वेस्ट रुग्‍णालयातील पाय-यामध्ये ठेवण्‍यात आले होते व नियमाचे उल्लंघन करुन इतरांच्या आरोग्यास व जिवीतास धोका पोहोचेल अशा स्थितीत दिसून आले. सुर्यचंद्र रुग्‍णालय हे नियमांचे पालन करीत नसल्याचे यावरुन स्पष्ट होते. आपल्या रुग्‍णालयात आयसीयु मध्ये रुग्‍ण भरती असतांनाही दवाखान्यामध्ये कोणीही डॉक्टर्स रुग्णांच्या उपचाराकरीता हजर नव्हते. रुग्णालयातील व्यवस्थापकांच्या भरवशावर रुग्णालय सोडले होते.

कार्यरत व्यवस्थापकांनी डॉक्टरांना संपर्क साधून हजर राहण्याची विनंती करुनही तपासणी टिम समक्ष जवळपास अर्धा तास वाट पाहुनही कोणतेही डॉक्टर हजर झाले नाही. त्यामुळे रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णांची कोणतीही काळजी रुग्णालयाकडून घेण्यात येत नव्हती उलट रुग्णाच्या जीवाशी खेळ होत आहे असे आढळून आले. तसेच सुर्यचंद्र रुग्‍णालयातील बिले तपासले असता रुग्णांना नियमांव्यतीरीक्त बिले देऊन त्यांच्याकडून भरपूर रस्कम आकारण्यात येत असल्याचे सुध्दा आढळून आले. सुर्यचंद्र रुग्‍णालय याबाबतची सुध्दा नियमांचे पालन करीत नसल्याचे यावरून स्पष्ट होते. सुर्यचंद्र रुग्णालयाने शासनाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचा भंग केला आहे. दि. 31 मार्च 2021 रोजी त्‍यांना दिलेल्‍या नोटीसचे उत्‍तर सुध्‍दा असमाधानकारकरित्‍या सादर केले आहे.

           मनपा आयुक्‍त यांच्‍या आदेशान्‍वये आज दि. 10 एप्रील रोजी सुर्यचंद्र रुग्‍णालयाला Bombay Nursing Homes Registration Act, 1949 अन्‍वये एक महिन्‍याच्‍या आत यासर्व तृटींची पुर्तता करण्‍याकरिता नोटीस देण्‍यात आली आहे. सदर तृटी पुर्ण करण्‍यास ते असमर्थ ठरल्‍यास Bombay Nursing Homes अॅक्‍टनुसार त्‍यांचे रजिस्‍ट्रेशन केंसलेशनची कार्यवाही करण्‍यात येणार.

दिव्यांग सोशल फाउंडेशन तर्फे जागतिक आरोग्य दिन संपन्न व शहिद जवानांना श्रद्धांजली

आभाळमाया असलेली माणसं वाचायलाचं हवी- …………

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here