वंचीतांनी केला वंचिताचा सत्कार.

WhatsApp Image 2021 04 10 at 7.57.40 PM 2

वंचीतांनी केला वंचिताचा सत्कार.

अकोट तालुका विशेष प्रतिनिधी संजय सपकाळ 9767723794

पणज येथील ग्रामपंचायत सदस्य तथा भोईराज कॅलेंडर चे निर्माता रतनलाल तायडे भोई यांनी श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थानी वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश घेतला त्यामुळे आनंद झालेल्या गावकऱ्यांनी तथा वंचित असलेल्या घटकांनी त्यांचा सत्कार केला. वंचित घटकांना योग्य, उच्चशिक्षित आणी तीस पस्तीस वर्षे महसूल विभागाचा अनुभव असलेले व्यक्तीमत्व आपल्याला नेतृत्व म्हणून लाभल्या मुळे पणज चे सरपंच मधुकर कोल्हे व ग्रामपंचायत चे सर्व सदस्यांनी . बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्याचे प्रांगणात सदर सत्कार कार्यक्रमाचे आयोजन केले होते.लॉकडाउन व संचारबंदीचे सर्व नियम पाळुन अगदी मोजक्या व्यक्तीं कार्यक्रमास उपस्थित होत्या.त्याच बरोबर प्रवाहाच्या अगदी विरुद्ध पोहणारा विद्यार्थी म्हणजे मागासवर्गीय व मराठी भाषीक असुनही कठीणात कठीण अशी ऊर्दू भाषेत फर्स्ट क्लास मध्ये प्राविण्य प्राप्त करून डि. एड. ची परीक्षा पास केली असा विद्यार्थी अजय गौतम कोल्हे याचे सत्कारमूर्ती रतनलाल तायडे भोई यांनी शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन कौतुक केले. कार्यक्रमाला प्रदीपसिंह ठाकुर, विकास देशमुख, गजानन आकोटकर,गणेश भारसाकडे, हिमायत हुसेन, ओम शेंडे, साबीरभाई,संजय सावीकार, सुरेश तायडे, पत्रकार दिनेश ध. बोचे, संजय गवळी, असे लॉकडाऊन चे नियमानुसार मर्यादित व्यक्ती उपस्थित होते. आभारप्रदर्शन अनिलकुमार रोकडे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here