mnpa

लॉकडाउन नियमाचे उल्‍लंघन करणा-या आणि मास्‍क न लावणा-यांवर मनपा प्रशासनाव्दारे 13100/- रूपयांची दंडात्‍मक कारवाई.

अकोला दि. 10 एप्रील 2021 – अकोला महानगरपालिका क्षेत्रामध्‍ये कोरोना रुग्‍णांच्‍या संख्‍येत होत असलेली वाढ लक्षात घेता जिल्‍हा प्रशासनाव्‍दारे अकोला जिल्‍ह्यात लॉकडाउन लावण्‍यात आले असून यामध्‍ये सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत फक्‍त जीवनावश्‍यक वस्‍तू जसे हॉस्‍पीटल, रोगनिदान सेंटर्स, क्लिनिक्‍स, मेडीकल इंशुरंस कार्यालये, औषध विक्रेते व कंपन्‍या, ईतर वैद्यकीय आरोग्‍य सेवेशी संबंधीत घटक व पशुवैद्यकीय सेवा, किरणा दुकाने, भाज्‍यांचे दुकाने, फळ दुकाने, डेअरी, बेकरी, मिठाई दुकाने हे सुरू ठेवण्‍यासाठी परवानगी देण्‍यात आली आहे. तसेच सर्व रेस्‍टारंट/हॉटेल्‍स/उपहारगृह मालकांना फक्‍त (Take Away) पार्सल सुविधेची आणि होम डिलेव्‍हरी मुभा देण्‍यात आली आहे.

त्‍या अनुषंगाने आज दि. 10 एप्रील रोजी अकोला महानगरपालिका अंतर्गत पुर्व झोन, पश्चिम झोन, उत्‍तर झोन, दक्षिण झोन आणि विशेष पथकाव्‍दारे मास्‍क न घालणा-या एकुण 43 नागरिकांवर रू. 8600/- ची आणि लॉकडाउन नियमाचे उल्‍लंघन करणा-या एकुण 3 व्‍यावसायिक प्रतिष्‍ठानांवर रू.3000/- ची तसेच सोशल डिस्‍टसींग नियमाचे उल्‍लंघन करणा-या 1 व्‍यावसायिक प्रतिष्‍ठानावर रू. 1000/- असे एकुण 13100/- रूपयांची दंडात्‍मक कारवाई करण्‍यात आली आहे.

अकोला महानगरात कोरोना विषाणूचा वाढत असलेला प्रादुर्भाव लक्षात घेता शहरातील नागरिकांनी सोशल डिस्‍टसींग नियमाचे काटेकोरपणे पालन करणे तसेच चेह-यावर मास्‍क आणि सॅनीटायरझरचे वापर करून तसेच प्रशासनाव्‍दारे वेळोवेळी दिलेल्‍या सुचनांचे पालन करून कोरोनाला आळा घालण्‍यासाठी सहकार्य करण्‍याचे प्रशासनाव्‍दारे आवाहन करण्‍यात आले आहे.

गांधी चौक स्थित हॉस्‍पीटलला मुंबई नर्सींग अॅक्‍ट अन्‍वये रजिस्‍ट्रेशन रद्द करणेसंदर्भात मनपा आयुक्तांनी दिली नोटीस

वंचीतांनी केला वंचिताचा सत्कार.

आभाळमाया असलेली माणसं वाचायलाचं हवी- …………

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here