पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा सोमवार (दि.१९) पासून ऑनलाईन

अकोला : जिल्‍हा कौशल्‍य विकास , रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र , अकोला. या कार्यालया मार्फत पंडीत दीनदयाल उपाध्‍याय रोजगार मेळाव्‍याचे आयोजन सोमवार दि.१९ ते शुक्रवार दि.२३ दरम्‍यान ऑनलाइन पद्धतीने करण्‍यात आले आहे.

या रोजगार मेळाव्‍यात विविध कंपनीतील रिक्‍तपदांकरीता ऑनलाईन भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. दहावी , बारावी , पदवीधर पदविका उत्तिर्ण शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांना नोकरीची उत्‍तम संधी उपलब्‍ध होणार आहे. या ऑनलाईन रोजगार मेळाव्‍यात सहभागी होऊ इच्‍छीणाऱ्या युवक / युवतींनी मेळाव्‍यातील रिक्‍त पदांची माहिती घेण्याकरीता कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्‍या www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईट वर भेट दयावी .

या रोजगार मेळाव्‍यात सहभागी (Apply) होण्‍याकरीता कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्‍या www.rojgar.mahaswayam.gov.in या पोर्टलवर आपला प्राप्‍त सेवायोजन कार्ड ( Employment Card ) चा आय डी व पासवर्ड चा वापर करुन आपल्‍या लॉग इन मधुन आपल्‍या शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्‍ध असलेल्‍या रिक्‍तपदांकरिता सहभाग (Apply) नोंदवून या ऑनलाईन रोजगार मेळाव्‍यात सहभागी व्‍हावे. तसेच ज्‍या उमेदवारांनी अद्याप कौशल्‍य विकास , रोजगार व उद्योजकता विभागाच्‍या www.rojgar.mahaswayam.gov.in या पोर्टलवर नोंदणी केलेली नाही त्‍यांनी प्रथम नोंदणी करुन प्राप्‍त युजर आयडी व पासवर्डच्‍या आधारे रोजगार मेळाव्‍यात सहभाग (Apply) नोंदवून रोजगार प्राप्‍त करुन घ्‍यावा. याबाबत काही अडचण आल्‍यास कोव्‍हीड – १९ या विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता या कार्यालयाच्‍या ०७२४ – २४३३८४९ या दुरध्‍वनी क्रमांकावर संपर्क साधावा,असे आवाहन सहायक आयुक्‍त श्रीमती प्रांजली यो. बारस्‍कर जिल्‍हा कौशल्‍य विकास , रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र , अकोला. यांनी केले आहे.

‘ब्रेक द चेन’ अंतर्गत असे होईल उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे कामकाज

जप्त केलेली वाहने टाळेबंदी नंतरच मिळणार- कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here