काळाबाजाराचे पोलिसांकडून उत्खनन, बडे डाॅक्टर रडारवर

अकोला : कोविड-१९ या आजारासाठी वापरण्यात येणार्या रेमडेसिविर या इंजेक्शनच्या काळाबाजाराचे पोलिसांकडून सखोल तपास सुरु असून, काही बडे डाॅक्टरवर रडावर असल्याची माहिती सूत्रांनी दिली. इंजेक्शनचा काळा बाजार करण्यात खासगी हाॅस्पिटलमधील कर्मचार्यांच्या सहभागाची शक्यता असली तरी ते संबंधित डाॅक्टरसह आणखी कोणत्या सांगण्यावरून हा गोरखधंदा करीत होते, हे शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोार उभे ठाकणार आहे.

लवकरच याबाबत काही घडामोडी घडण्याची शक्यताही सूत्रांनी व्यक्त केली. त्यामुळे कोरानाच्या संकटकाळात रूग्णांना लुटणार्यांना पोलिसांनी यानिमित्ताने जन्माची अद्दल घडवावी, अशी अपेक्षा अकोलेकरांमधून व्यक्त होत आहे. कोरोना सारख्या संसर्गजन्य रोगावर उपयोगात येणार्या रेमडेसिविर इंजेक्शनचा सध्या सर्वत्र तुटवडा आहे. उपचाराअभावी नागरिक मृत्युमुखी पडत आहेत. असे असताना अकोल्यातील रामनगर भागात या इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याची माहिती गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी माहितीची खातरजमा केल्यानंतर एका युवकाला इंजेक्शन विना कागदपत्राचे, देयक व डॉक्टर प्रिस्क्रिप्शनशिवाय विकत असल्याचे कळले. याप्रकरणी पाच जणांना पोलिसांनी अटक केली असून, रामनगरातील एका डाॅक्टरची तर दोन दिवसांपासून चैकशी सुरु आहे. दरम्यान, उपचार सुरु असलेल्या कोरोना बाधित रुग्णाजवळ त्याचे नातेवाइक-परिचित नसतात. अनेकदा हे रुग्ण अतिदक्षता विभागात असतात. या खासगी रुग्णालयाकडून रुग्णाच्या नातेवाइकांनी रेमडेसिविर इंजेक्शनची विकत आणण्यासाठी चिठ्ठी देण्यात येते. अनेकदा यापैकी दोन-तीन इंजेक्शन हे संबंधित रुग्णासाठी न वापरता ते काळ्या बाजारात या रुग्णालयातील कर्मचार्यांकडून िवकण्यात येत असल्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. रुग्णाजवळ त्याचे नातेवाइक नसल्याचा असा गैरफायदा घेण्यात येतो.

केंद्र सुरू होण्यासाठी हालचालींना वेग, ऑक्सिजनसाठी प्रयत्न

1 मे महाराष्ट्र दिनी अकोला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करा अन्यथा छेडण्यात येईल तीव्र आंदोलन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here