IMG 20210427 205719

पेट्रोलपंपाच्या वेळेत बदल

अकोला,दि.२७(जिमाका)-  कोविडचा फैलाव रोखण्यासाठी लागु करण्यात आलेल्या निर्बंधात अंशत: बदल करुन पेट्रोल-डिझेल पंपांच्या वेळेत बदल केल्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.

या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व (मनपा, शहरी, ग्रामिण भागातील) पेट्रोल, डिझेल, सीएनजी, एलपीजी इतयादी पंप सकाळी सात ते 11 वाजेपर्यंत. अकोला मनपा क्षेत्रातील-  1) एम.आर. वजीफदार ॲण्ड सन्स आळशी प्लॉट 2) केबीको ॲटो सेंटर, अकोट रोड, 3) वजीफदार ॲण्ड कंपनी अग्रसेन चौक, 4) प्राईड सेल्स सर्वो दीपक चौक, 5) अलंकार सर्वो वाशीम बायपास, 6) साईशिल्प गोरक्षण रोड, अकोला  हे पंप सकाळी सात ते रात्री आठ पर्यत सुरु राहतील. मात्र या पंपावर सकाळी 11 वा. नंतर केवळ शासकीय वाहने, मालवाहतुक, रुग्णवाहिका इत्यादी अत्यावश्यक सेवेतील वाहनांना इंधन पुरवठा करतील.

याच संदर्भात तालुकास्तरावर अत्यावश्यक सेवेतील वाहनांसाठी संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांनी स्वतंत्र्य आदेश निर्गमित करावे, असे आदेशात म्हटले आहे. तर महामार्गावरील पेट्रोल पंप(मनपा क्षेत्र वगळुन) हे नियमित वेळेनुसार सुरु राहतील, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

काळाबाजाराचे पोलिसांकडून उत्खनन, बडे डाॅक्टर रडारवर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here