IMG 20210427 215942

जिल्हा परिषद व पंचायत समिती रिक्त पदांचे निवडणुकीसाठी मतदान केंद्राची यादी प्रसिद्ध

अकोला,दि.२७(जिमाका)-  राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार अकोला जिल्हा परिषद व मुर्तिजापूर पंचायत समितीच्या रिक्त पदांच्या निवडणुकीसाठी मतदार यादी कार्यक्रम घोषित  करण्यात आले आहे. मुर्तिजापूर तालुक्यातील 17- लाखपुरी व 18- बपोरी हे जिल्हा परिषद निवडणूक विभाग तसेच 39-माना व 46-मानडी हे पंचायत समिती निर्वाचक गण यांची मतदान केंद्राची यादी तयार करुन जिल्हाधिकारी कार्यालय अकोला, जिल्हा परिषद कार्यालय अकोला, उपविभागीय अधिकारी कार्यालय मुर्तिजापूर, तहसिल कार्यालय मुर्तिजापूर, संबंधित ग्रामपंचायत कार्यालय व संबंधित तलाठी कार्यालयांचे नोटिस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. तसेच निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्यानंतर त्यानुसार निश्चित केलेल्या मतदान केंद्रावर मतदान घेण्यात येणार आहे, असे मुर्तिजापूर तहसिलदार प्रदीप पवार यांनी कळविले आहे.

पेट्रोलपंपाच्या वेळेत बदल

काळाबाजाराचे पोलिसांकडून उत्खनन, बडे डाॅक्टर रडारवर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here