doctars

आंतरवासीता डॉक्टरांचं तुर्तास आंदोलन मागं

अकोला :6/5/21: अधिष्ठाता यांच्या दालनाबाहेर सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनादरम्यान आंतरवासीता डॉक्टरांच्या काही मागण्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये यांनी मान्य केलेय. त्यामुळेआंतरवासीता डॉक्टरांकडून पुकारण्यात आलेला संप तुर्तास आंदोलन मागे घेतलाय..

कोरोनािवरुद्धच्या लढ्यात रुग्णसेवा करुन सक्रिय सहभाग नोंदवणार्या शासकीय वैद्यकीय महािवद्यालयातील प्रशिक्षणार्थी डाॅक्टरांच्या संयमाचा बुधवारी बांध फुटला. मागण्या मंजूर होत नसल्याने त्यांनी महाविद्यालयातील प्रशासकीय इमारतीत धाव घेतली. त्यांनी घोषणा देत संपाचीही हाक दिली. दररोज १२ तास रुग्णसेवा करुन केवळ ३६० रुपये मानधन मिळते. आम्हाला विमा कवचही नसून, सर्वांचे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण झालेले नाही, अशा शब्दात या डाॅक्टरांनी अन्यायाचा पाढाच वाचला.

जील्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, सरकारी व खासगी रूग्णालयांत खाटांचा तुटवडा निर्माण झाला. त्यामुळे खाटा वाढवत असले तरी उपचारासाठी डाॅक्टर व प्रशिक्षित डाॅक्टरांची संख्या कमी आहे. त्यामुळे कोरोनािवरुद्धच्या लढाईत प्रशिक्षणार्थी डाॅक्टरांना उतरवले आहे. त्यात १३४ डाॅक्टरांचा समावेश आहे. दरम्यान बुधवारी शासकीय वैद्यकीय महािवद्यालयातील प्रशिक्षणार्थी डाॅक्टरांनी प्रलंबित मागण्यांसाठी आक्रमक भूमिका घेत घोषणा दिल्या. आंदोलनादरम्यान आंतरवासीता डॉक्टरांच्या काही मागण्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये यांनी मान्य केलेय. यामध्ये प्रामुख्याने आंतरवासीता डॉक्टरांना एन ९५ मास्क देणे, रुग्णसेवे दरम्यान पॉझिटिव्ह आलेल्या आंतरवासीता डॉक्टरांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करुन देणे, कोविड लस उपलब्ध करुन देणे आदी मागण्यांचा यातं समावेश आहे. या शिवाय, कोविड भत्त्या वाढविण्यासंदर्भात संचालनालयाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन आंतरवासीता डॉक्टरांना देण्यात आले. त्यामुळे हा संप आंतरवासीता डॉक्टरांनी तुर्तास आंदोलन मागे घेतलाय..

औद्योगिक उत्पादन निर्देशांक तयार करण्यासाठी वेबपोर्टलचे अनावरण

18 ते 44 वर्ष वयोगटाकरीता कोव्हॅक्सीन लस प्राप्त

मे महिन्यात मिळणार मोफत धान्य; लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा , जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आवाहन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here