सुपर स्पेशालिटीमध्ये होणार २५० खाटांचे कोविड रुग्णालय

सुपर स्पेशालिटीमध्ये होणार २५० खाटांचे कोविड रुग्णालय

अकोला  : कोरोना बांधितांची संख्या लक्षात घेता सर्वोपचार रुग्णालयाजवळ असलेल्या सुपर स्पेशालिटी हाॅस्पिटलमध्ये २५० खाटांचे कोविड रुग्णालय सुरु होणार आहे. यात ५० खाटा अतिदक्षता कक्षासाठी राहणार आहेत. याबाबत वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी अधिकार्यांची ऑनलाइन बैठक घेऊन हा निर्णय घेतला.

या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार अकोला येथील कोविड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सर्वोपचार रुग्णालयातील सुपर स्पेशालिटी हाॅस्पिटल कार्यांन्वित होणे आवश्यक आहे. याठिकाणी कोविड रुग्णालय झाल्यास अकोलेकरांना दिसाला मिळेल. दरम्यान सुपर स्पेशालिटी हाॅस्पिटल तातडीने सुरू करण्यात यावे, असे आदेश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी वैद्यकीय शिक्षण सचिव सौरभ विजय आणि वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांना दिले आहेत. सोबतच कोविड रुग्णालयासाठी आवश्यक असणारे चतुर्थश्रेणी कर्मचारी तसेच नर्सेस स्थानिकरित्या नेमण्यात यावेत आणि तातडीने या रुग्णालयाचे काम सुरू करण्यात यावे, असे आदेशही वैद्यकीय शिक्षण मंत्री देशमुख यांनी दिले आहेत. दरम्यान, शासनाच्या सुपर स्पेशलिटी हाॅस्पिटलसाठी २२३ पदांनाच राज्य सरकारने यापूर्वीच मंजुरी दिली. मात्र या हाॅस्पिटलसाठी १ हजार २६ पदांची आवश्यकता असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. तसेच मंजूर पदेही भरण्यात आली नाहीत.

उद्या रविवार रात्री १२ पासून ते शनिवार दि.१५ च्या रात्री १२ वाजेपर्यंत कडक टाळेबंदी; किराणा, दुध, भाजी,फळांची दुकाने बंद

करोना संक्रमनापासून बचवाकरिता व लसीकरणाबाबत महावितरण कर्मचाऱ्यांना डॉक्टरांचे ऑनलाईन मार्गदर्शन

बियाणे िवतरण याेजना; जाचक अटींमुळे शेतकरी वंचित

शिलोडा येथील सिव्हरेज ट्रीटमेंट प्लांटची महापौर अर्चना मसने यांनी केली पाहणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social media & sharing icons powered by UltimatelySocial
WhatsApp5k
100