तापत्या उन्हातही आपलं कर्तव्य चोखपणे बजावतात

pol

तापत्या उन्हातही आपलं कर्तव्य चोखपणे बजावतात

अकोला :  उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढतोय. त्यामूळे जनजीवनही विस्कळीत होतंय…पण उकळत्या उन्हातही पोलीस आपलं कार्य चोखपणे बजावतायेत. असं असतांनाही उन्हापासून संरक्षणासाठी त्यांना कुठल्याही सुविधा मिळत नाहीय…परिणामी त्यांना कोरोना सोबत आता उन्हाचाही सामना करावा लागत आहे.

मार्च, एप्रिल आणि मे महिन्यामध्ये तापमानात मोठी वाढ होते.. त्यामुळे दुपारच्या वेळी व्यवहार थंडावलेले दिसतात.. तुमच्या भन्नाट वेगाला आणि कोरोनाला आवर घालणार्या , नियमांचं पालन करून घेणार्या पोलीस दादांची ही कर्मकहाणी.. वाहतूक पोलिसांना या तापत्या उन्हातही आपलं कर्तव्य चोखपणे बजावाव लागत आहेय.. शहरामध्ये सध्या उड्डाण पूल , रस्ते निर्माणमुळे वाहतूक पोलिसांना संरक्षण शेडची सुविधा विस्कळलेली आहेय… विदर्भात सध्या उष्णतेची लाट आहे , अकोला शहराचं तापमान गेल्या काही दिवसांपासून ४२ डिग्री वर पोहचल आहे…. तापत्या उन्हात वाहतूक पोलिसांना आपली कामगिरी करतांनाच त्यांना नियमित कारवाई सुद्धा करावीच लागते… मागील लॉक डाउनच्या काळात बिनकमी फिरणार्या ८५०० वाहनांवर करत सडे पाच लाख दंड वसूल करण्यात आलं होतं… कोरोनाच्या काळात अकोला पोलिसांना कोरोना सोबत उन्हासोबतही दोन हात करावे लागत आहे… पोलिसांची अकोल्यातील ही समस्या राज्यातील पोलिसांचं दुख सांगणारी प्रातिनिधिक समस्या आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social media & sharing icons powered by UltimatelySocial
WhatsApp5k
100