नियमांच्या अंमलबजावणीत यंत्रणांची उदासीनता

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आज ९ मे च्या रात्री १२ पासून कडक टाळेबंदी लागू करण्यात येणार असल्याने शनिवारी आज रविवार रोजी बाजारात नागरिकांनी खरेदीसाठी प्रचंड गर्दी केल्याचे दिसून आले. सकाळी ११ पर्यंत किराणा, दुध, खाद्यपदार्थ, भाजीपाला-फळ अशी अत्यावश्यक साहित्य विक्रीची दुकाने सुरू होती. त्यामुळे बाजारपेठेमध्ये नागरिकांनी गर्दी केली होती. अनेकांनी व्यवस्थित मुखपट्टी न लावल्याचे या वेळी दिसून आले. तर काही जण फीजिकल डिस्टन्सिंगचे पालन करीत नव्हते.

कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकार्यांनी जिल्ह्यात निर्बंध जारी केले आहेत. बिगर अत्यावश्यक साहित्याची दुकाने बंद करण्यात आली. भाजीपाला, फळ विक्रीच्या व्यवस्थेतही बदल करण्यात आला. विनाकारण संचार करण्यावरही रोख लावण्यात आला मात्र तरीही बाजारपेठेतील गर्दी कमी होताना दिसून आली नाही. दरम्यान, पोलिस व महापालिकेचे कर्मचारी शनिवारी आज रविवार रोजी सकाळी ११ नंतर आणखी सक्रिय झाले. गांधी चैक, महाराणा प्रताप चैक, जयहिंद चैक, डाबकी रोडसह अन्य ठीकाणी पोलिसांनी बॅरिगेट्स लावून वाहन चालकांची विचारपूस करण्यात येत होती… यावेळी अनेकांनी व्यवस्थित मुखपट्टी न लावल्याचे या वेळी दिसून आले. तर काही जण फीजिकल डिस्टन्सिंगचे पालन करीत नव्हते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here