mnpa

महापालिका आयुक्त यांच्या दालनात व्यावसायिक आशीष ढोमणे यांचा आत्मदहनाचा प्रयत्न

अकोला : जनता भाजीबाजारात किरकोळ व्यवसाय करणार्या व्यावसायिकांना महापालिका आयुक्तांनी नोटीस बजावल्यामुळे उद्विग्न होऊन भाजपच्या कामगार आघाडी सेलचे विदर्भ प्रभारी अध्यक्ष तथा व्यावसायिक आशीष ढोमणे यांनी सोमवारी १० मे रोजी महापालिका आयुक्त यांच्या दालनात अंगावर रॉकेल ओतून घेतले व आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी अटकाव केल्याने अनर्थ टळला.

      जनता भाजी बाजारांमध्ये व्यापारी संकुल बांधण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे जनता भाजीबाजारात व्यापार्यांनी व्यवसाय करू नये आणि व्यवसाय करणार्यांना महापालिका आयुक्त यांनी नोटीस बजावली. गैर कायदेशीर रित्या नोटीस बजावल्यामुळे व्यापार्यांवर उपासमारीची वेळ आली आहे तसेच शहरात इतर ठिकाणी ही जागा असताना जनता भाजी बाजारातच व्यापारी संकुलाचा आग्रह केला जात आहे, असा प्रश्न उपस्थित करून आशीष ढोमणे यांनी सोमवारी दुपारी महापालिकेतील आयुक्तांच्या दालनात आत्मदहनाचा प्रयत्न केला.

तापत्या उन्हातही आपलं कर्तव्य चोखपणे बजावतात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here