mnpa

६०० मिमीची जलवाहिनी फुटल्याने पाच जलकुंभांचा पाणीपुरवठा २ दिवसाने पुढे

अकोला : पाणीपुरवठा विभागाच्या िनयोजना अभावी शहराच्या काही भागाला पाच दिवसांआड पाणी पुरवठा सुरु झाला असताना १० मे रोजी खडकी जवळ रस्त्याचे काम सुरु असताना शहराला पाणी पुरवठा करणारी ६०० मिमी व्यासाची जलवाहिनी फुटली. परिणामी शहरातील पाच जलकुंभांचा पाणीपुरवठा दोन दिवसांनी पुढे ढकलला आहे.

        शहराला ९०० आणि ६०० मिमीच्या जलवाहिनीने पाणीपुरवठा केला जातो. पाणीपुरवठा विभागाच्या ढिसाळ नियोजनाने शहरातील काही भागाचा पाणी पुरवठा चार ऐवजी पाच दिवसांवर गेला आहे. यामुळे त्रस्त नागरिकांना जलवाहिनी फुटल्याने फटका बसला आहे. अकोला ते मंगरुळनाथ रस्ता दुरुस्ती सुरु आहे. हे काम सुरु असताना खडकीजवळ शहराला पाणी पुरवठा करणार्या ६०० मिमीची जलवाहिनी फुटली. त्यामुळे पाण्याचा अपव्यय झाला. शहरातील नवीन बसस्थानका मागील दोन, शिवनगरातील दोन, आश्रय नगरातील एक अशा एकूण पाच जलकुंभांचा पाणी पुरवठा दोन दिवसाने पुढे ढकलला. सोमवारी ज्या भागाला पाणी पुरवठा होणार होता, त्या भागाला पाणी पुरवठा विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे होवू शकला नाही. तर जलवाहिनी फुटल्याने मंगळवारी होणारा पाणी पुरवठा गुरुवारी होणार आहे.

महापालिका आयुक्त यांच्या दालनात व्यावसायिक आशीष ढोमणे यांचा आत्मदहनाचा प्रयत्न

तापत्या उन्हातही आपलं कर्तव्य चोखपणे बजावतात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here