भाजपच्याच कार्यकर्त्यांना भाजपच्या स्थानिक नेतृत्वाकडून अपमानास्पद वागणूक
भारतीय जनता पक्षात गेल्या सात ते आठ वर्षात नविन स्थानिक नेतृत्वाकडून अपमानास्पद वागणुक मिळत आहे. स्नानिक नेतृत्वाच्या अहंकारामुळे पक्षात अनेक जण दुखावले आहेत. जे दुखावले आहेत ते बोलू शकत नाहीत. या अन्यायाला कोणीतरी वाचा फोडणे गरजेचे होते. त्यामुळे आता अपमान सहन करण्याचा कळस गाठल्याने भूमिका स्पष्ट करणे गरजेचे होते. आम्ही भारतीय जनता पक्षातून बाहेर पडत नसुन पक्षात राहून संघर्ष करणार आहोत.परंतु पक्षाच्या विरोधात काम करणार नाही. मात्र विधानसभा निवडणुकीपासून दुर राहणार आहोत. तसेच निवडणुकी नंतर पक्षात सुरु असलेला हा सर्व प्रकार वरिष्ठ नेत्यांना कळविणार आहोत, अशी माहिती भाजपचे मनपा माजी महापौर अश्विनीताई हातावळने भाजपचे माजी नगरसेवक प्रतुला हातवळणे यांनी दिनांक 8 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता जसनागरा येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
भारतीय जनता पक्षात आम्ही ३४ वर्षापासून काम करीत आहोत. स्व.भाऊसाहेब फुंडकर, स्व.गोवर्धन शर्मा, संजय धोत्रे यांचे आम्ही कार्यकर्ते आहोत. मात्र गेल्या सात ते आठ वर्षापासून पक्षातील परिस्थिती बदलली आहे. सातत्याने अपमान केला जात आहे. माजी महापौर असताना कोणत्याही कार्यक्रमाला बोलावल्या जात नाही, कुठेही स्थान दिले जात नाही. सातत्यानने केवळ अपमान सुरु आहे. विशेष म्हणजे पक्षात जातीयवाद सुरु आहे. २०१७ च्या महापालिकेच्या निवडणुकीत माजी महापौर असले तरी तिकीट मागू नका, तिकीट मिळणार नाही. त्यामुळे अपमान करुन घेवू नका, असे स्पष्ट सांगण्यात आले. हा अपमानही आम्ही सहन केला कारण आम्ही पक्षाशी एकनिष्ठ आहोत. विधानसभेची उमेदवारी मागीतली तेव्हाही खिल्ली उडविण्यात आली. हा अपमानही सहन केला. केवळ माजी राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांचे काम केले किंवा त्यांच्या सोबत राहातो म्हणून हा अपमान सुरु आहे. मात्र डॉ.पाटील हे दुसऱ्या पक्षाचे नव्हे तर तेही भाजपचेच आहेत, तरीही असा प्रकार घडतो. मात्र दोन दिवसापूर्वी जो प्रकार घडला तो सहन करण्यापलीकडे आहे. मात्र नेमका काय प्रकार घडला हे त्यांनी सांगण्यास नकार दिला. परंतु जे घडल ते फार दु:खदायी आहे. त्यामुळेच विधानसभा संचलन समितीचा मी राजीनामा देत असून विधानसभा निवडणुकीपासून दुर राहणार आहे. परंतु पक्षाच्या विरोधात काम करणार नाही,अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
————
राजीनामाच देणार होतो
मी पक्ष सदस्यपदाचा राजीनामाच देणार होतो. मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा न देण्याची सुचना करुन पक्षात राहून संघर्ष करा, असा सल्ला दिल्याने मी राजीनामा देणार नाही. माझ्या सारखे दुखावलेले अनेक कार्यकर्ते आहेत. परंतु कोणीही पुढे येत नाही. या सर्वाना सोबत घेवून विधानसभा निवडणुकी नंतर आपण पक्षातील वरिष्ठ नेत्यांची भेट घेवून या प्रकाराला आळा घालण्याची मागणी करणार आहोत, असेही प्रतुल हातवळणे आणि माजी महापौर अश्विनीताई हातवळणे यांनी स्पष्ट केले.
कार्यकर्त्याच्या खच्चीकरणाचे काम सुरु
पक्षात गुणात्मक कार्यकर्त्यांच्या खच्चीकरणाचे सुरु आहे. खऱ्या अर्थाने आम्ही भाजपमधील शोषित आहोत. २०१२ मध्ये विजय अग्रवाल यांनी बंडखोरी केली. त्यांच्या विरोधात मी लढलो. २०१४ च्या निवडणुकीत पक्षाचे काम केले तरी २०१७ च्या मनपा निवडणुकीत डावलण्यात आले. स्विकृत नगरसेवक केले. मात्र तेही अडीच वर्षासाठी. निधी देखिल इतरांच्या तुलनेने कमी दिला. कारण एखादा कार्यकर्ता मोठा होवू नये. मी स्वत: सीएम, डेप्टी सिएम यांना भेटून कोट्यवधीचा निधी आणला. मात्र मंत्रालयातील अधिकाऱ्यांवर दबाव आणण्यात आला, कार्यकर्त्यांची टिंगल टवाळी करण्यात येत आहे आमचा जन्म भाजप मधला असून बाकी सारे बाहेरुन आलेले आहेत, असे सांगून आपण वरिष्ठांना बंदोबस्त करण्याची मागणी करणार आहोत, असे यावेळी उपस्थित अॅड.गिरीश गोखले यांनी स्पष्ट केले.