खडकी परिसरातील बालाजी नगर रहिवासी यांनी केली येथील रोड डांबरीकरण करण्याची मागणी

खडकी येथील बालाजी नगर चा रोड डांबरीकरण करण्याच्या मागणी करीता बालाजी नगरवासीयांचे या रस्त्यावर आंदोलन


खडकी येथील बालाजी नगर चा रोड डांबरीकरण करण्याच्या मागणी करीता बालाजी नगरवासीयांचे या रस्त्यावर आंदोलन

अकोला शहरातील खडकी परिसरातील बालाजी नगर रहिवासी यांनी रोड डांबरीकरण करण्याची मागणी केली आहे बालाजी नगर येथील सार्वजनिक रस्ता हा 20 वर्षापासून डांबरीकरण करण्यात आला नाही सदर रस्ता डांबरीकरण करण्यासाठी परिसरातील नागरिकांनी वारंवार नगरसेवक व महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेक वेळा मागणी केली आहे.

परंतु या परिसरातील नागरिकांच्या समस्या कडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे असा आरोप बालाजी नगर रहिवाश्यांनी केला आहे महाराष्ट्र शासनाकडून मोठ्या प्रमाणात स्थानिक नगरसेवक व आमदार यांना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध असल्या वरही बालाजी नगर येथील सार्वजनिक रस्ता डांबरीकरण करण्यास टाळाटाळ होत आहे तरी या परिसरातील रस्ता लवकरात लवकर डांबरीकरण करावा अशी मागणी रहिवाशी यांनी केली असून रोड डांबरीकरण न झाल्यास सर्व नागरिक जिल्हाधिकारी यांना या बाबत तक्रारींचे निवेदन देणार असल्याचे यावेळी परिसरातील नागरिकांनी सांगितले.

ही बातमी youtube ला पाहण्यासाठी खालील लिंक क्लिक करा

https://youtu.be/HPke90FFZXYPost a Comment

Post Kaisi lagi Jarur Bataye or Post share jarur kare ..Thanks

थोडे नवीन जरा जुने