अकोला पंचायत समिती बीडीओ कार्यलाय समोर शर्ट काढून निंभोरा गावकऱ्यांचे ठिय्या आंदोलन

 ग्रामसेवकची मागणी करीत अकोला पंचायत समिती बीडीओ कार्यलाय समोर शर्ट काढून निंभोरा गावकऱ्यांचे ठिय्या आंदोलन



अकोला : मौजे निंभोरा तालुका जिल्हा अकोला येथील नागरिकांना लोक अदालत च्या माध्यमातून घर कर पाणीपट्टी कर भरण्यासाठी प्रत्येक नागरिकाला नोटीस देण्यात आलेली असल्याने गावकरी हे घर कर,पाणी पट्टी कर भरण्यासाठी तयार असून या गावातील ग्रामपंचायत कार्यालय बंद असून  ग्रामसेवक सुद्धा येथे हजर राहत नाही असा आरोप गावकऱ्यांनी केलाय,त्यामुळे आम्हीं घर कर,पाणी पट्टी कर भरायचा कुठे असा प्रश्न या गावकऱ्यांना पडला या बाबत ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच यांच्याशी विचारणा 

केली असता ते सुद्धा आम्हांला माहीत नाही असे सांगत असल्याचे या निवेदनात नमुद केले आहे या विषयी निभोरा गावातील ग्रामपंचायत सुरू करा व ग्रामसेवक यांना हजर राहण्याचे आदेशीत करा अश्या मागणीचे निवेदन आज दि 24 नोव्हेंबर रोजी या गावातील नागरिक 

सागर आवारे , तुळशीराम सूर्यवंशी,देवानंद सावळे यांनी अकोला पंचायत बीडीओ यांच्या कार्यलाय आले असता बीडीओ कार्यलयात हजर नसल्याने या गावकऱ्यांनी बीडीओ कार्यलाय अकोला यांच्या कार्यल्यासमोर शर्ट काढून आंदोलन केले.

Post a Comment

Post Kaisi lagi Jarur Bataye or Post share jarur kare ..Thanks

थोडे नवीन जरा जुने