गुंठेवारी नियमानुकूल च्या कामाला मुदतवाढ ; मनपा आयुक्त

गुंठेवारी नियमानुकूल च्या कामाला मुदतवाढ ; मनपा आयुक्त


गुंठेवारी नियमानुकूलचे प्रस्‍ताव ऑफलाईन पध्‍दतीने स्विकारल्‍या जाणा-या कामाला 31 डिसेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ – कविता व्दिवेदीमनपा आयुक्‍त तथा प्रशासक.

अकोला दि. 24 नोव्‍हेंबर 2022 – महाराष्ट्र गुंठेवारी विकास (नियमाधिन करणेश्रेणीवाढ व नियंत्रण) अधिनियम2001 यात सुधारणा करण्यासाठी अधिनियम दिनांक 12 मार्च2021  अन्वये अकोला महानगरपालिका क्षेत्रा अंतर्गत गुंठेवारी भुखंड/इमारत नियमानुकूल करण्याबाबत ऑनलाईन पध्दतीने मंजुरी प्रदान करण्याबाबतची कार्यवाही सुरु करण्यात आली होती. मात्र उक्त प्रणालीमध्ये काही तांत्रिक कारणास्तव मंजूरी प्रदान करण्यास विलंब होत असल्याचे तसेच नागरीकांना अकारण  त्रास होत असल्याचे प्रशासनाचे निदर्शनास आले आहे.


या अनुषंगाने मनपा आयुक्‍त तथा प्रशासक कविता व्दिवेदी यांच्‍या आदेशान्‍वये नागरिकांना अधिक सोईचे व्‍हावे यासाठी विशिष्ट कालावधी करिता ऑफलाईन पध्दतीने गुंठेवारी नियमानुकूल करण्याबाबतचे प्रस्ताव स्विकारण्याचे निश्चित करण्यात आले होते, व त्‍याची मुदत 25 नोव्‍हेंबर रोजी संपुष्‍टात येत असून नागरिकांकडून यासाठी भेटणारे प्रतिसाद लक्षात घेता आणि नागरिकांच्‍या प्राप्‍त विनंती लक्षात घेता गुंठेवारी नियमाकुलचे प्रस्‍ताव ऑफलाईन स्विकारण्‍यासाठी मनपा आयुक्‍त तथा प्रशासक कविता व्दिवेदी यांच्‍या  आदेशान्‍वये 31 डिसेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ देण्‍यात येत असून दि. 31/12/2022 पर्यंत गुंठेवारी निमयानुकूल करण्याबाबतचे ऑफलाईन प्रस्ताव हे कार्यालयीन दिवशी अकोला महानगरपालिका सहाय्यक संचालकनगर रचनायांचे कार्यालयतसेच सर्व क्षेत्रिय कार्यालय येथे संपुर्ण आवश्यक कागदपत्रास प्रस्ताव स्विकारण्यात येतील कृपया संबंधीतांनी याची नोंद घ्‍यावी.गुंठेवारी नियमानुकूल करण्याबाबतचे ऑफलाईन प्रस्ताव हे दिनांक 31/12/2022 पर्यंतच स्विकारण्यात येतीलया तारखेनंतर प्राप्त होणारे ऑफलाईन प्रस्ताव स्विकारण्यात येणार नाही याबाबत सर्व नागरीक संबंधीत वास्तुविशारदअभियंतासर्वेअरआरेखक यांनी नोंद घ्यावी. तसेच या संधीचा जास्‍तीत जास्‍त लाभ घेण्‍याचे मनपा प्रशासनाव्‍दारे आवाहन करण्‍यात येत आहे.  


प्रस्ताव दाखल करण्याकरिता 

आवश्यक कागदपत्राची सुची या प्रमाणे आहे 

विहित नमुन्‍यात अर्जखेरदी खत 

दि. ३१ डिसेंबर २०२० पुर्वीचे

नमुना ड/गांव नमुना सातअभियंता 

यांनी प्रमाणीत केलेला मोजणी 

नकाशाखाजगी रेखांकन 

नकाशाची छायांकित प्रत

क्षतीपुर्ती बंधपत्र 

 (Indemnity Bond Affidavit) लेजर 

पेपरवरप्रतिज्ञा पत्र 

(१०० रू. स्‍टॅम्‍प पेपर Affidavit),

 स्‍वयंघोषीत प्रमाणपत्रचालू वर्षाचा

 मोकळ्या जागेच/इमारतीचा कर 

भरणा पावतीआधार कार्ड 

छायाप्रत. Google Map 

रंगीत फोटोबांधकाम असल्‍यास

 स्‍ट्रक्‍चरल स्‍टॅबिलिटी

 प्रमाणपत्र (आवश्‍यकतेनुसार),

 विज बिल छायाप्रतवास्‍तूविशारद/

अभियंता/आरेखक यांचेकडील 

गुंठेवारी अधिनियम अंतर्गत 

नियमावलीनुसार नकाशा ३ प्रती 

(अभियंता व अर्जदार यांचे स्‍वाक्षरीसह).


Post a Comment

Post Kaisi lagi Jarur Bataye or Post share jarur kare ..Thanks

थोडे नवीन जरा जुने