पोळा चौक येथे ज्येष्ठ मल्लांच्या गौरव सोहळ्याचे आयोजन.
सिने अभिनेते दीपक शिर्के यांच्या हस्ते होणार जुन्या मल्लांचा गौरव अकोला सामाजिक सेवा कार्यात सातत्याने सहकार्य व सेवा करणाऱ्या पोळा चौक येथील संत गाडगेबाबा बहुद्देशीय संस्था व पोळा चौक मित्र परिवाराच्या वतीने महानगरात प्रथमच अकोल्यातील कुस्तीचा अटकेपार झेंडा रोवणाऱ्या ज्येष्ठ श्रेष्ठ मल्लांच्या गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये महानगराचे राष्ट्रीय स्तरावर कुस्ती क्षेत्रात नाव नेणाऱ्या मल्लांचा गौरव मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार असल्याची माहिती संत गाडगेबाबा बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष व सेवाभावी कार्यकर्ते अनिल मालगे यांनी दिली . संस्थेच्या वतीने शुक्रवारी पोळा चौक येथे आयोजित या सोहळ्याच्या पत्रकार परिषदेत या उपक्रमाची माहिती त्यांनी दिली.
मैदानी खेळात कुस्ती व आयुष्यात पैलवान हे नाव अजरामर करताना ज्यांनी हयातभर कष्ट करून अकोल्याच्या कुस्ती विश्वाला नवी उभारी व झळाळी देण्याचा प्रयत्न केला व आपल्या कुटुंबासमवेत जिल्हा , गाव व नगराचे नाव अजरामर केले , अशा ज्येष्ठ श्रेष्ठ पैलवानांचा गौरव सोहळा पोळा चौक परिसरात करण्यात येणार आहे.
27 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता पोळा चौक परिसरात हा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला असून कुस्तीगिरांच्या या गौरव सोहळ्याचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे हे करणार असून प्रमुख पाहुणे म्हणून मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते , तिरंगा फेम दीपक शिर्के हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत . माजी आ . तुकाराम बिरकड यांचे अध्यक्षतेत संपन्न होणाऱ्या या गौरव सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून साताऱ्याचे माजी आ . मदनराव भोसले , सिने दिग्दर्शक निलेश जळमकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.अकोल्यात प्रथमच होत असणाऱ्या या आगळ्यावेगळ्या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असून अनेक मल्ल व त्यांच्या कुटुंबियांना निमंत्रित करण्यात आले आहे.
अत्यंत शिस्तबद्ध व सुव्यवस्थेत होणाऱ्या या कार्यक्रमात ज्येष्ठ व दिवंगत कुस्तीगिरांच्या जीवन परिचयाचा आलेख चित्रफितीच्या माध्यमातून सादर करण्यात येणार आहे . या आगळ्यावेगळ्या गौरव सोहळ्यात जिल्ह्यातील समस्त पैलवान व सेवाभावी कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष अनिल • मालगे यांनी यावेळी केले . या पत्रकार परिषदेत संत गाडगेबाबा बहुउद्देशीय संस्थेचे व पोळा चौक मित्र परिवाराचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .
टिप्पणी पोस्ट करा
Post Kaisi lagi Jarur Bataye or Post share jarur kare ..Thanks