शहरातील इंटरनेट कॅफेंवर दामिनी पथकाची छापेमारी! बारा मुली- मुले पोलिसांच्या ताब्यात
अकोला : जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या निर्देशावरून शुक्रवारी सायंकाळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या शिकवणी वर्ग परिसरात असलेल्या इंटरनेट कॅफेवर दामिनी पथकाने छापे टाकून संस्यास्पद मिळून आलेल्या बारा मुली मुलांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई केली.
जिल्हा पोलीस अधीक्षकांना या कॅफेंवर कारवाही करण्याकरिता उद्धव शिवसेना गटाने तक्रारी व निवेदने दिली होती त्या अनुषंगाने .जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या संदर्भात कारवाई करण्याचे निर्देश दामिनी पथकाला दिले. दामिनी पथक च्या प्रमुख पोलीस निरीक्षक उज्वला देवकर व त्यांच्या चमुने तीन इंटरनेट कॅफेवर धाड टाकून 12 मुला मुलींना ताब्यात घेतले.
त्यांच्याविरुद्ध सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात प्रतिबंधक कारवाई करण्यात आली व त्यांच्या पालकांना बोलावून त्यांना स्वाधीन करण्यात आले इंटरनेट कॅफे संचालकांनी त्यांना नेमून दिलेली नियमावली चे पालन केले किंवा नाही .ही बाबही पोलीस तपासून पाहत आहेत . नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई सुद्धा करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
टिप्पणी पोस्ट करा
Post Kaisi lagi Jarur Bataye or Post share jarur kare ..Thanks