सालासर बालाजी मंदिर येथे भव्य तीन दिवसीय जन्मोत्सवाचे आयोजन

सालासर बालाजी मंदिर येथे भव्य तीन दिवसीय जन्मोत्सवाचे आयोजन सालासार बालाजी सेवा समितीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली

जयपूर येथील ऐतिहासिक हवामहल प्रवेशद्वार व वारकरी संतांची राहणार भक्तिमय झाकी 

सालासर बालाजी मंदिर येथे तीन दिवसीय हनुमान जन्मोत्सवाचे भव्य आयोजन सालासार बालाजी मंदिरात सेवा समितीची माहिती

अकोला : गंगानगर बायपास परिसरातील गत आठ वर्षापासून भक्ताच्या नवसाला पावणाऱ्या व अनेक अदभूत व नयनरम्य कार्यक्रम साकार करणानाऱ्या सालासर बालाजी मंदिर येथे तीन दिवसीय हनुमान जन्मोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले असून त्यात नवी नवलाई भाविकांसाठी निर्माण करीत असल्याची माहिती सालासार बालाजी सेवा समितीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली . सालासार बालाजी मंदिरात संपन्न या पत्रकार परिषदेत या तीन दिवसीय जन्मोत्सवाची संपूर्ण माहिती देण्यात आली . सालाबादप्रमाणे यावर्षी ही दि 5 एप्रिल ते 7 एप्रिल पर्यंत हा महोत्सव आयोजित करण्यात येत आहे. 


या तीन दिवसीय हनुमान जन्मोत्सवात भक्तांसाठी प्रथमच मंदिराच्या प्रवेशद्वारावर जनपूर येथील विश्वप्रसिद्ध हवामहलची आकर्षक विशाल प्रतिकृती निर्माण करण्यात येणार आहे . तसेच राज्यातील वारकरी संप्रदायातील सर्व संतांची गंत दर्शन झाकी भाविकांचे लक्ष वेधणार आहे . महोत्सव काळात मंदिराच्या गर्भगृहात रामायणातील अशोक वाटिकेचा जिवंत रंगीत देखावा झानी रूपाने भक्तांसाठी सादर करण्यात येणार आहे . दिनांक 5 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता महानगरातील ख्यातीप्राप्त अशा सालासार सत्संग मंडळाच्या वतीने भव्य सामूहिक सुंदरकांडचा कार्यक्रम आयोजित होणार आहे . यानंतर हनुमान जन्मोत्सवाचा मुख्य सोहळा हा हनुमान जयंती दिनांक 6 एप्रिल रोजी भक्ती भावात साजरा करण्यात येणार असून या पावन दिनी सकाळी 5-45 वाजता पुरोहित व मान्यवर यजमानांच्या हस्ते हनुमंतांचा जन्मोत्सव सोहळा भक्ती भावात संपन्न होणार आहे. 


तसेच सायंकाळी 7 वाजता हनुमान स्रोत व आरतीचे सामूहिक पठण करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले . विश्व प्रसिद्ध जयपुरची हवामहत झाकी बघण्यासाठी दिनांक 7 एप्रिलच्या रात्री पर्यंत भक्तांच्या सोयीसाठी अवधी सेवा समितीने उपलब्ध करून दिला आहे . जन्मोत्सवाच्या या तीन दिवसीय महोत्सवात भाविक भक्तांसाठी विशेष व्यवस्था सेवा समितीने उपलब्ध केली असून परिसरात सेल्फी पॉईंट निर्माण करण्यात आले आहेत .

तसेच बालकांसाठी उद्यान व खेळण्यासाठी अनेक स्टॉल परिसरात उपलब्ध करण्यात आले असून या भक्तिमय पर्यावर मंदिरात रंगीत रोषणाई व पुलांची सजावट करण्यात येणार असून भाविकांसाठी दर्शनाची उत्तम व्यवस्था करण्यात येणार आहे व पूजा सामग्री व बच्चे कंपनीच्या करमणुकीचे स्टाल लावण्यात येणार आहेत . सालासार बालाजी मंदिरात वार्षिक चार मोठे महोत्सव साजरे करण्यात येत असतात . या महोत्सवात भाविकांची अलोट गर्दी होत असते . 

कृष्ण जन्माष्टमी च्या भव्य दिव्य सोहळ्यापासून पासून या भव्य दिव्यतेला प्रारंभ होत असतो . त्यानंतर दिवाळीमध्ये देव दीपावलीला हजारो दीपमालांची आरास साकार करण्यात येऊन ही आरास वपण्यासाठी भाविक सालासार बालाजी मंदिरात उपस्थित होऊन याचा लाभ घेत असतात . तसेच गालासार बालाजी मंदिरात महाशिवरात्रीचा मोठा महोत्सव साजरा करण्यात येऊन यामध्ये अनेक देखावे व झाक्या राजविण्यात येत असतात . या भव्य दिव्यतेच्या उपक्रमांची पूर्णाहुती हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने होत असते . या चारही भव्य दिव्य महोत्सवास महानगरच नव्हे किंबहुना राज्यातील अनेक ख्यातनाम मान्यवर लोकप्रतिनिधी , व्यापार , उद्योग , समाज व सांस्कृतिक विश्वातील अनेक दिग्गज भाविक मोठ्या संख्येने येत असतात असे यावेळी सांगण्यात आले . भाविकांनी या तीन दिवसीय हनुमान जन्मोत्सवाचा मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले . या पत्रकार परिषदेत सालासार बालाजी सेवा समितीचे समस्त पदाधिकारी व सेवाधारी उपस्थित होते .Post a Comment

Post Kaisi lagi Jarur Bataye or Post share jarur kare ..Thanks

थोडे नवीन जरा जुने