स्थानिक जलाराम मंदिरात लोहाना गुजराती समाजातील ज्येष्ठ नागरिकांचा झाला गौरव

स्थानिक जलाराम मंदिरात लोहाना गुजराती समाजातील ज्येष्ठ नागरिकांचा झाला गौरव


अकोला -स्थानीय बिर्ला गेट परिसरातील संत जलाराम मंदिरात लोहाना गुजराती समाजातील वयोवृद्ध  सेवाभावी नागरिकांचा गौरव सोहळा मोठया उत्साहात संपन्न झाला.

 सामाजिक,सांस्कृतिक व धार्मिक सेवेत सक्रिय असणाऱ्या श्री जलाराम मंदिर, लोहाना महाजन ट्रस्ट, जलाराम सेवा भजन मंडळ, रघुवंशी मंगल कार्यालय,लोहाना विद्यार्थी भवन ट्रस्ट, लोहाना महिला मंडळ व नवयुवक मंडळाच्या संयुक्त विद्यमाने  मंदिराच्या विसाव्या पाटोसवानिमित्त आयोजित या गौरव सोहळ्यात लोहाना महाजन ट्रस्टचे अध्यक्ष मनसुखभाई भाटी, मंत्री राजूभाई सोढा, जलाराम सेवा भजन मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर द्रोण,महेंद्रभाई  पोपट, रघुवंशी मंगल कार्यालय ट्रस्टचे अध्यक्ष चंदूभाई आडतीया, विनोदभाई चांदरानी, लोहाना विद्यार्थी भवन ट्रस्टचे अध्यक्ष रवीभाई सायानी,  निकुंज गढीया, लोहाना महिला मंडळाच्या अध्यक्षा गीत बेन रुपारेल, रश्मीबेन विठलानी,युवक मंडळाचे महेश कोटक, वरुण  रूपारेल, शुभम चांदराणी आदी मान्यवर उपस्थित होते. संत जलाराम बाप्पा यांच्या प्रतिमा पूजन,दीप प्रज्वलन,रघुकुल गौरव गीत व सुंदरकांड महिला ग्रुपच्या वतीने राम स्तुतीने या सोहळ्याचा प्रारंभ करण्यात आला. प्रास्ताविक कनुभाई सायानी यांनी करीत युवकांनी सामाजिक सेवेच्या कार्यात स्वतःस झोकुन देत सामाजिक सेवा करण्याचे आवाहन केले. या सोहळ्यात लोहाना गुजराती समाजातील 75 वर्षावरील जेष्ठ समाजसेवींचा गौरव करण्यात आला. यात 155 महिला,पुरुष वरिष्ठ व वयोवृद्ध नागरिकांना शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह प्रदान करून मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी महिलांनी त्यांना ओवाळून त्यांच्या दीर्घायुष्याची कामना केली. आपल्या मनोगतात जलाराम भजन मंडळाचे नंदकिशोर द्रोण यांनी या उपक्रमाची माहिती देत अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला हा उपक्रम समाजाच्या साक्षीने साकार करण्यात आल्याचे सांगितले. या मान्यवर समाजसेवीचे स्वागत मनसुख भाटी नंदकिशोर द्रोण, चंद्रकांत अडतीया, राजूभाई सोढा, अशोक रूपारेल,अश्विन पोपट,महेंद्र खंदेडिया,नयना कारिया, निकिता भाटिया, रेखा उनडकाट, गीता चोलेरा, कुंदन कारीया, गीता नथवाणी,डॉली  कारिया,विजय पलन, मायाबेन लोहाना, भरत चोलेरा, हिना चोलेरा, रश्मी विठलानी, सोनल ठक्कर, दिनेश पहु, स्मिता जोबनपुत्र, परेश सेदानी, कुंदनबेन चोलेरा, कीर्ती सायानी,जितेंद्र कोटक, शितल रूपारेल, घनश्याम ठक्कर, लता गढीया, प्रतीक्षा चांदराणी, भावना जीवानी,हिरल पोपट,लताबेन रूपारेल,अर्पिता पहू ,मनोज भीमजीयानी, भावना भाटी, हर्षा पोपट, सुशीलाबेन द्रोण, आशिष जीवाणी, कुणाल पोपट, सागर कारिया, वत्सल सेजपाल, अशोक रूपारेल, गीता रूपारेल, अमित खिरया आदींनी केले. यावेळी आशीष चंदाराणा यांची राज्य विद्युत मंडळाच्या सूत्रधारी कंपनीच्या संचालक पदी झालेल्या नियुक्ती बद्दल त्यांचा समाजाच्या वतीने गौरव करण्यात आला.स्वागत  सोहळ्याचे संचालन राधाबेन सावजीयानी यांनी तर गौरव सोहळ्याचे संचालन सोनलबेन ठक्कर, राधिका बेन जिवाणी यांनी केले तर आभार  गोविंद सोढा यांनी मानले. कार्यक्रमाच्या सफलतेसाठी समाजाच्या नववधू समूहाच्या शितल गणात्रा, हिना कारिया, पिनल कोटक,कीर्ती आडतीया, पूजा पोपट,सोनिया कारिया, भक्ती ठक्कर, स्वाती ठक्कर, तृप्ती भाटी, दिव्या भाटी, हिरल ठक्कर, हिरल पोपट,सोनिया कारिया, गीता ठक्कर, प्रीती गणात्रा, शितल गणात्रा, गायत्री चांदरानी, प्रीती भीमजियानी, प्रज्ञा भीमजियाणी, रचना भीमजीयानी, सपना भीमजियाणी,खुशी मणियार , निलेशा पोपट,,पूजा गणात्रा, भावना कारिया, पिनल कोटक, पूजा पोपट,छाया कारीया धनश्री पोपट समवेत.

श्री जलाराम मंदिर, लोणाना महाजन ट्रस्ट, जलाराम सेवा भजन मंडळ, रघुवंशी मंगल कार्यालय,लोहाना विद्यार्थी भवन ट्रस्ट, लोहाना महिला मंडळ व नवयुवक मंडळाच्या समस्त पदाधिकारी वर्गाने मेहनत घेतली. महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता झाली.





Post a Comment

Post Kaisi lagi Jarur Bataye or Post share jarur kare ..Thanks

थोडे नवीन जरा जुने