माहेश्वरी समाजाचा महेश नवमी उत्सव गुरूवार पासून

माहेश्वरी समाजाचा महेश नवमी उत्सव गुरूवार पासून 
श्री राज राजेश्वर मंदिर पासून निघणार भव्य शोभायात्रा   
माहेश्वरी समाजाचा महेश नवमी उत्सव गुरूवार पासून

अकोला - माहेश्वरी समाजाचा उत्पती दिवस पावन महेश नवमीचे आयोजन दि 29 मे रोजी सकल माहेश्वरी समाजाच्या वतीने करण्यात आले आहे. या अनुषंगाने माहेश्वरी समाज ट्रस्ट व संलग्न संस्थांच्या वतीने महेश  नवमी उत्सव साजरा करण्यात येत असून यामध्ये अनेक रंगारंग उपक्रमांची रेलचेल राहणार असल्याची माहिती माहेश्वरी समाज ट्रस्टच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. 

स्थानीय माहेश्वरी भवनात संपन्न झालेल्या पत्रकार परिषदेत माहेश्वरी समाज ट्रस्टचे अध्यक्ष विजय पनपालिया, प्रधानमंत्री विजयकुमार राठी,महिला मंडळाच्या अध्यक्षा हेमा खटोड,प्रगती मंडळ अध्यक्ष आनंद डागा,नवयुवती मंडल अध्यक्ष स्नेहल सावल आदी मान्यवर उपस्थित होते.

उत्सवाचा प्रारंभ समाज ट्रस्टचे अध्यक्ष विजय पनपालिया, प्रधानमंत्री विजयकुमार राठी,उत्सव प्रमुख सुधीर रांदड यांच्या मार्गदर्शनात दि गुरूवार दि 25 मे पासून होत असून या दिनी सकाळी ९ वा माहेश्वरी भवनात भगवान महेश याच्या झाकीची विधिवत स्थापना करण्यात येऊन उत्सवास प्रारंभ होणार आहे. 

या दिनी सकाळी 6 वाजता समाज ट्रस्ट व प्रगती मंडळाचा क्रिकेट सामना होणार असून दुपारी 4 वाजता माहेश्वरी भवनात वरीष्ठ नागरिक महिला प्रकोष्ठच्या वतीने प्रश्नोत्तरी कार्यक्रम होणार आहे.त्या नंतर नवयुवती मंडळाचा सांस्कृतिक कार्यक्रम होऊन आरती ने  सायं या  प्रथम सत्राचे समापन होणार आहे.

शुक्रवार दि 26 मे रोजी सकाळी 9 वाजता भगवान महेश आरती होऊन सकाळी 10 वाजता सौ देवकीबाई विजयकुमारजी सोमाणी चॅरीटेबल ट्रस्ट तर्फे डॉ संतोषजी  सोमाणी द्वारे जिल्हा महिला रुग्णालयात फळ वितरण करण्यात येणार आहे.

दुपारी 4-30 वाजता माहेश्वरी भवनात वरिष्ठ नागरिक प्रकोष्टच्या वतीने वाद विवाद स्पर्धा होणार आहे. वर्तमान शिक्षण प्रणाली ही विवाह विलंब व वैवाहिक सामंजस्यतेच्या निर्वहनात बाधक आहे काय या विषयावर ही वादविवाद स्पर्धा होणार.रात्री 7 वाजता भगवान महेश यांच्या आरतीने या द्वितीय सत्राचे समापन होणार आहे.

शनिवार दि 27 मे रोजी सकाळी 9 वाजता भगवान महेश यांची आरती होणार आहे. यानंतर प्रगती मंडळाच्या वतीने विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात येणार आहेत. तर सकाळी 9-30 वाजता महिला मंडळाच्या वतीने मातृ पितृ पूजन सोहळा होणार आहे. 

सायंकाळी 6-30 वाजता महिला मंडळाच्या वतीने नात्यांची सुंदरता या संकल्पनेवर आधारित भव्य सांस्कृतिक  रिश्तों  की खुबसूरती छटा साकार करण्यात येणार आहे. यानंतर भगवान महेश यांच्या सामूहिक आरतीने या सत्राचे समापन करण्यात येणार आहे.रविवार दि 28 मे रोजी सकाळी 6 वा प्रगती मंडळाच्या वतीने भव्य मराथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. 

सकाळी 9-30 वाजता माहेश्वरी भवनात प्रगती मंडळाचे संघटन शक्तीवर व्याख्यान होणार आहे.दु 4 वाजता पुरस्कार वितरण सोहळा होणार असून यात पाहुणे म्हणून अमरावती येथील श्री गणेशदासजी राठी छात्रावास समिति चे अध्यक्ष वसंतकुमारजी मालपाणी तर कार्यक्रम अध्यक्ष श्री राधाकिशन तोष्णिवाल पब्लिक चॅरीटेबल ट्रस्टचे ट्रस्टी श्री विनोदकुमारजी तोष्णीवाल उपस्थित राहणार आहेत.

रात्री 7 वाजता भगवान महेश यांच्या आरतीने सत्र समाप्ती होणार आहे. महेश नवमीचा मुख्य सोहळा सोमवार दि 29 मे  रोज़ी होत असून सकाळी 9 वाजता महेश आरती ने या उत्सवाच्या प्रारंभ होणार आहे.

त्यानंतर सकाळी 9-30 वाजता महेश नवमी सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले मुंबई येथील आनंद राठी अँड सेक्युरिटीजचे चेअरमन व शेअर बाजार तज्ञ आनंदजी राठी व एम के व्हेंचरचे संस्थापक मधुसुदनजी केला हे शेअर बाजार व व्यापार उन्नती या विषयावर  प्रमिलाताई ओक सभागृहात मार्गदर्शन करणार आहेत.

दुपारी 4 वाजता राज राजेश्वर मंदिर येथून भगवान महेश यांची विविध देखावे व झांकी समवेत शोभायात्रा निघणार आहे.ही शोभायात्रा जयहिंद चौक,सिटी कोतवाली, टिळक रोड, ब्रजलाल बियाणी चौक,जुना कापड बाजार,जैन मंदिर,गांधी चौक,मनपा चौक, तहसील मार्गे माहेश्वरी भवन येथे पोहचून या शोभायात्रेचे नवमी उत्सवात रूपांतर होणार आहे. 

माहेश्वरी भवन येथे सायंकाळी 6-45 वाजता अरविंदजी सोनी व सौ मीना सोनी यांच्या हस्ते भगवान महेश यांची पूजा अर्चना करण्यात येणार आहे. मुख्य नवमी सोहळा सायंकाळी 7 वाजता होणार असून यात मुंबई शेअर बाजार तज्ञ आनंदजी राठी व मधुसुदनजी केला हे समाज बांधवांना मार्गदर्शन करणार असून या महेश नवमी उत्सवात समाजाच्या महिला पुरुष युवक युवतीने मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.

पत्रकार परिषेदेत यावेळी समाज ट्रस्टचे राजेश लोहिया, नरेश बियाणी,रमण हेडा, अनिल लटुरिया, महेश मुंदडा, प्रवीण हेडा, प्रदीप राठी,प्रमोद लटुरिया, सुरज काबरा,अखिलेश कोठारी ,वंदना हेडा, निकिता बजाज उपस्थित होते. संचालन प्रधानमंत्री विजयकुमार राठी यांनी तर आभार सहायक मंत्री विनीत बियाणी यांनी मानले.

Post a Comment

Post Kaisi lagi Jarur Bataye or Post share jarur kare ..Thanks

थोडे नवीन जरा जुने