तेल्हारा कृषी ऊत्पन्न बाजार समितीमधे पुन्हा इतिहास...!!
भारिप बहुजन महासंघ ते आता वंचित बहुजन आघाडी ह्यांनी आजपर्यंत अनेक इतिहास घडविले आहेत. जो समुदाय सत्तेपासुन वंचीत आहे, जो समुदाय शोषित आहे, पिढ्यानपिढ्या ज्या समुदायाला कधी राजकारण साधी ओळखही नव्हती अश्या समुदायातील वंचित राहिलेल्यांना सत्तेची दालनं खुली करुन देत शोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग करून सत्तेच्या सर्वोच्च पदावर बसविने हिच वंचित बहुजन आघाडीची आजपर्यंत ओळख आहे,
आणि याच शोशल इंजिनिअरिंगला ऍड बाळासाहेब आंबेडकर यांचा "अकोला पँटर्न"म्हणतात, जि.प. व प.स. तसेच विधानसभेमधे अनेक लहान लहान जाती समुहाला सत्ता मिळवुन देण हे जरी या शोशल इंजिनिअरिंगमुळे सोपं झालं असलं तरी सहकार क्षेत्रामधे हे शक्य नाही असं इथल्या प्रस्थापित व सहकार लॉबीवाल्यांकडून बोलल्या जात होते, परंतु ऍड बाळासाहेब आंबेडकरांनी एकमेकांना मते देवू व सत्ता आपल्या हाती घेवू हे ब्रीद वाक्य वापरून सहकार क्षेत्रामधेसुद्धा अकोला पँटर्नची पुनरावृत्ती करून दाखवली.
भारिप बहुजन महासंघाचे माजी तालुकाध्यक्ष तथा वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि बौद्ध समाजातील असलेले मा. सुनिलभाऊ इंगळे यांच्या रुपाने पहिल्यांदा वंचित बहुजन आघाडीवर निवडणूक लढवून कृषी ऊत्पन्न बाजार समिती तेल्हारा मधे बौद्ध समाजाचे सभापती पदावर विराजमान केले.
श्रध्देय ॲड बाळासाहेब आंबेडकर यांनी आज वंचित बहुजन आघाडीचे मा. सुनिलभाऊ इंगळे यांना सहकार क्षेत्रातील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती करून सहकार क्षेत्रात वंचित समुदायालाही सत्तेच्या सर्वोच्च पदावर बसता येते हे सिद्ध करुन दाखवले.
आता पुढील निवडणुकीत खऱ्या अर्थी न घाबरता सर्वांना निवडणूक लढण्याचे बळ अकोला पॅटर्नने मिळवून दिले. आम्हा वंचितांना सतत न्याय दिल्याबद्दल ऍड बाळासाहेब आंबेडकर यांचे स्वागत केले जात आहे! तसेच नवनिर्वाचित सभापती सुनिल इंगळे यांचे अभिनंदन होत आहे सुनील इंगळे आपण या सत्तेच्या माध्यमातून शेतकरी व ग्रामीण भागातील लोकांना योग्य मार्गदर्शन करून बाजार समितीत आजपर्यंत न राबलिलेल्या विविध प्रकारच्या लोकहिताच्या योजनांचा लाभ शेतकरी व ग्रामीण भागातील वंचित समुदायाला देवून वंचित बहुजन आघाडीचे नाव महाराष्ट्रभर गाजवतिल अशी अपेक्षा केल्या जात आहे.
विकास सदांशिव सह जिल्हा प्रसिद्धी प्रमुख वंचित बहुजन आघाडी अकोला यांनी प्रसिद्धीपत्रका द्वारे दिली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Post Kaisi lagi Jarur Bataye or Post share jarur kare ..Thanks