30 अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघाचे राजेश कृपाशंकर मिश्रांचे जल्लोशात स्वागत.
30 अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघाचे उमेदवार राजेश मिश्रा यांचे आज सकाळची प्रचार पदयात्राचे जल्लोष्यात स्वागत करण्यात आले. रेणुका माता मंदिर,गोड़बोलेप्लॉट, डाबकी रोड,अकोला आणि प्रभाग क्र.१० संपूर्ण परिसरात सकाळी अपक्ष उमेदवार राजेश मिश्रा ह्यांनी स्वतः घरोघरी जाउन सर्वांचा आशीर्वाद घेतला, यावेळी राजेश मिश्रा यांचे आतिषबाजी करीत ढोल ताश्याच्या निनादात मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत जल्लोष्यात स्वागत करीत राजेश मिश्रा यांना विजयाची हमी दिली. या प्रचार यात्रेचा समारोप काळा मारोती मंदिरजवळ, करण्यात आला.यावेळी मोठया संख्येने मतदार व कार्यकर्ते उपस्थित होते.