जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेची 3 ठिकाणी मोठी कारवाई

Spread the love

जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेची 3 ठिकाणी मोठी कारवाई

आचारसंहिता काळात गावठी हातभ‌ट्टी दारूच्या जिल्हयात वेगवेगळ्या ठिकाणी 3 मोठया कारवाई; पोलीस अधीक्षकांची प्रेस नोट

अकोला : आगामी येणा-या लोकसभा निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने पोलीस अधिक्षक अकोला बच्चन सिंह यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने अकोला जिल्हयातील अवैध दारू विक्री करणारे तसेच गावठी हातभ‌ट्टीवर दारू तयार करूण विक्री करणा-यां आरोपीतांविरुध्द कारवाई करणे सुरू केले आहे ज्यामध्ये जिल्ह्यामध्ये 3 वेगवेगळ्या ठिकाणी गावठी हातभट्टी दारू विक्री व काढणाऱ्यांवर छापा कारवाई केलीय

दिनांक ०९/एप्रिल/२०२४ रोजी पो.स्टे. हिवरखेड हद्‌दीमधील ग्राम सिरसोली येथे छापा कारवाई करून ५ कॅन गावठी हातभ‌ट्टीची दारू एकूण १०० लिटर व ६५० लिटर सडवा असा एकूण ७५,०००/- रू.याचा मुद्देमाल आरोपीतांन जवळुन हस्तगत करून मु‌द्देमालासह पुढील कायदेशिर कारवाईकरिता पो.स्टे. हिवरखेड यांचे ताब्यात देण्यात आले आहे.तसेच दिनांक १०/एप्रिल/२०२४ रोजी पो. स्टे, पिंजर ह‌द्दीतील ग्राम पातुर नंदापुर येथून ९६० लिटर सडवा ५५ लिटर गावठी हातभट्टीची दारू व इतर साहित्य अशा एकुण १,५५,६००/ रूपयांवा मुद्देमाल जप्त करण्यात आला. व आरोपीस नमुद मु‌द्देमालासह पुढील कायदेशिर कारवाईकामी पो.स्टे. पिंजर यांचे ताब्यात देण्यात आले आहे.तसेच तिसरी कारवाई

दिनांक १०/एप्रिल/२०२४ रोजी पो.स्टे. खदान हद्दीतील ग्राम चांदुर येथील आरोपीतांकडून ६१५ लिटर सडवा, ४० लिटर गावठी हातभ‌ट्टीची दारू व इतर साहित्य असा एकूण ६५०००/ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. व आरोपीस नमुद मुद्देमालासह पुढील कायदेशिर कारवाईकागी पो.स्टे. खदान यांचे ताब्यात देण्यात आले आहे.अशी माहिती 10 एप्रिल रोजी दुपारी 5 वाजता पोलीस अधीक्षक कार्यालयातून प्रसिद्धीपत्रकाद्वारे मिळाली आहे.

अग्निशमन विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र व ईतर अग्निशामक उपाययोजना करणे गरजेचे.

सदरची कार्यवाही ही मा. पोलीस अधिक्षक श्री. बच्चन सिंह सा., मा. अपर पोलीस अधिक्षक श्री अभय डोंगरे सा,

यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि शंकर शेळके, स्थानिक गुन्हे शाखा अकोला पो.उप.नि. राजेश जयरे व स्थानिक गुन्हे शाखा अकोला येथील पोलीस अंमलदार दशरथ बोरकर, गोकुळ चव्हान, सुलतान पठाण, अब्दुल माजीद, रविंद्र खंडारे, भास्कर धोत्रे, महेंद्र गलिये, खुशाल नेमाडे, विशाल मोरे, अविनाश पाचपोर, एजाज अहेमद, लिलाधर खंडारे, अन्सार अहेमद, थिरज वानखडे, मोहम्मद आमीर, सतिश पवार, अशोक सोनवणे, तसेच चालक पो. अंमलदार प्रशांत कमलाकर, विजय कबले यांनी केली आहे.

जुना जनता कापड बाजार समोरील चौकात मोठा ट्रॅफिक जाम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *