गणगोर घाट येथे धार्मिक परंपरेने गणगोर उत्सव साजरा

Spread the love

गणगोर घाट येथे धार्मिक परंपरेने गणगोर उत्सव साजरा; शहरातील मुख्य मार्गावर बँड पथकासहित मिरवणूक

भारतीय संस्कृती संपूर्ण जगात सण उत्सवांची संस्कृती म्हणून ओळखल्या जाते. शिव पार्वतीचा धार्मिक उत्सव शिव म्हणजे गण आणि माता पार्वती म्हणजे गौर असे गणगोर हा सण उत्सव कुमारिका, नवविवाहितेचा आनंदात व उत्साहात श्रद्धेने सोळा दिवस साजरा करत असतात.

शहरातील राजस्थानी समाजातील कुमारीका नवविवाहितेचा व सौभाग्यवती महिला धार्मिक परंपरेने सोळा दिवस चालणारे गणगौर उत्सव मोठ्या उत्साहात आज दिनांक 11 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजून 20 मिनिटांनी मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.तर 91 वर्षांपासून मटका बाजार येथून काढण्यात येत असलेली गणगौर उत्सव शोभा यात्रा काढण्यात आली,तसेच अनेक मंडळांनी यात सहभाग गेतला मारवाडी युवा मंच अकोला शाखेच्या वतीने यावेळी शरबत वाटप केले तर श्री राम उत्सव समितीच्या वतीने गणगौर उत्सवात सहभाग घेत महिलांकरिता सेल्फी पॉईंट व श्री राम यांचे 5 हजार तैल चित्र देण्यात येऊन विविध उपक्रम राबविले.

राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी ‘काय करावे’ आणि ‘काय करू नये’ याबाबतची काही महत्त्वाची तत्वे
तर परशुराम चौक येथील गणगोर घाट येथे गणगोर मातेचे विसर्जन करण्यात आले.

 

जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेची 3 ठिकाणी मोठी कारवाई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *