FB IMG 1631383265059 AKOLA TIMES

लोकार्पण सोहळा संपन्न

लोकार्पण सोहळा संपन्न.

प्रतिनिधी प्रितेश वानखडे.

अकोला : डाबकी रोड जुने शहर प्रभाग क्रमांक 10 मधील रेणुकानगर श्रीराम चौक श्रीराम मंदिराच्या आवारभिंत बांधणे या कामाचे आज लोकार्पण करण्यात आले.

प्रभाग क्रमांक 10 चे नगरसेवक व माजी स्थायी समिती सभापती श्री. सतीश ढगे यांच्या लोककल्यानार्थ निधीतून सदर आवार भिंतीचे बांधकाम पूर्णत्वास केले गेले.

स्थानिक जेष्ठ व इतर नागरिकांना विरंगुळा व्हावा म्हणून व लहान मुले महिला यांना मोकळे वातावरणात मिळावे हा हेतू समोर ठेवुन, कंपाउंड वॉल चे बांधकाम करून विविध प्रकारचे वृक्ष लावण्यात येणार आहेत जेणेकरून मंदिर परिसरात येणाऱ्या भक्तांना शुद्ध ऑक्सिजनयुक्त हवा मिळेल व त्यांचे आरोग्य निरोगी राहील

तसेच बच्चे कंपनी ला विविध खेळ खेळता यावेत यासाठी उपायोजना करण्याचे आश्वासन देण्यात आले.

या कार्यक्रमला प्रमुख उपस्थिती मा. आमदार. लालाजी , श्री. विजयजी अग्रवाल महापौर सौ. अर्चनाताई मसने संजय भाऊ बडोने व नगरसेवक आणि रेणुका नगर भागातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

error: Content is protected !!