bulet AKOLA TIMES

फटाके फोडणारया बुलेटवर कडक कारवाई…

  • फटाके फोडणारया बुलेटवर कडक कारवाई…

अकोला : मागील काही दिवसांपासून शहर वाहतूक शाखेनं अकोला शहरात फटाके फोडणार्या बुलेट विरुद्ध धडक मोहीम राबवित आहे, त्या अंतर्गत बुलेटच्या मूळ सायलेन्सरमध्ये बदल करून फटाके फोडणारे सायलेन्सर लावून बुलेट चालविणार्या बुलेट राजांना चाप लागावा म्हणून अश्या बुलेट विरुद्ध धडक मोहीम सुरू आहे.. आता पर्यंत 25 वर बुलेट वाहतूक शाखेत लावून त्यांचेवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

जप्त करण्यात आलेल्या बुलेटचे सायलेन्सर बदलून घेऊन परत मूळ सायलेन्सर लावून मगच अश्या बुलेट सोडण्यात येत होत्या, सदर मोहिमेचा काही अंशी फरक पडला, परंतु शहरात अजूनही बरेच तरुण एक क्रेझ म्हणून अश्या फटाके फोडणार्या बुलेट सुसाट वेगाने चालवीत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत, या तक्रारीची दखल घेऊन पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या निर्देशा प्रमाणे पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी सायलेन्सर बदलून फटाके फोडणार्या बुलेट विरुद्धची मोहीम आणखी कडक केली..

आता अशा बुलेट आढळून आल्यास त्यांचे वर सरळ जप्तीची कारवाई करून अश्या बुलेट वाहतूक कार्यालयात लावण्यात येणार आहे.. त्यांचा अहवाल प्रादेशिक परिवहन कार्यालयात पाठवून त्यांची कारवाई झाल्या नंतरच त्यांचे निर्देशा नंतरच अश्या बुलेट सोडण्यात येणार आहेत, त्या साठी अकोला शहरात अश्या सायलेन्सर बदलून बुलेट चालविणार्या तरुणांनी ह्याची नोंद घ्यावी अन्यथा बुलेट जप्तीची कारवाईस तयार रहावे असा कडक इशारा शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी दिला आहे..

One thought on “फटाके फोडणारया बुलेटवर कडक कारवाई…

  1. Pingback: घरकुल फेरचौकशीचा जी.प.ला विसर - AKOLA TIMES

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

error: Content is protected !!