zp akola AKOLA TIMES

घरकुल फेरचौकशीचा जी.प.ला विसर

  • घरकुल फेरचौकशीचा जी.प.ला विसर

अकोला : 31 ऑगस्ट रोजी घेण्यात आलेल्या जी.प.स्थायी समितीच्या सभेत विरोधकांनी घरकुल विषया बाबत आक्षेप घेत चौकशी करुन पुन्हा सर्व्हेक्षण करण्याची मागणी केली होती.मात्र अजूनपर्यंत तरी जिल्हा परिषदेला याप्रकरणी मुहूर्त मिळत नसल्याचे दिसून येते आहे.

शासनाच्या जाचक अटीमुळे प्रपत्र ड यादीसाठी झालेल्या सर्व्हेत जिल्ह्यातील २१ हजार लाभार्थी अपात्र ठरविण्यात आले असून१५ ऑक्टोबर पर्यंत अंतिम यादी जाहीर होणार असल्याची माहिती आहे.या प्रकरणावर गत जी.प. स्थायीच्या बैठकीत सेनेने आक्षेप घेत खऱ्या लाभार्थ्यांवर अन्याय झाल्याचा आरोप करून जिल्हा परिषदेच्या यंत्रणेमार्फत या अपात्र लाभार्थ्यांची पुन्हा फेरचौकशी करुन पुन्हा सर्व्हेक्षण करण्याची मागणी विरोधकांनी केली होती.यावर प्रकल्प संचालक यांनी स्पष्टीकरण देत मापदंडानुसार करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणात ऑनलाइन प्रणालीत नावे अपात्र झाल्याचे स्पष्ट केले होते.

सत्ताधारी व विरोधकांनी गावपातळीवर सर्व्हेक्षण करण्याची मागणी केल्याने प्रपत्र डमध्ये गरजवंतांना वगळण्यात आलेल्या लाभार्थ्यांची वस्तुस्थिती व इतर बाबींची पुन्हा चौकशी करण्यात येवून या विषयीचा अहवाल राज्य शासनाला जिल्हा परिषदेच्या मार्फत पाठविण्यात येणार असल्याचे गेल्या सभेत ठरले होते.मात्र यावर दहा दिवस उलटले तरीही प्रशासनाच्या वतीने कुठलीही कार्यवाही झाली नाही.त्यामुळे हे सारं काही सभेसाठी व प्रसिद्धी मिळविण्यासाठी नेत हा स्टट करतात काय? ही बाब या निमित्ताने आता समोर आली आहे.

One thought on “घरकुल फेरचौकशीचा जी.प.ला विसर

  1. Pingback: सोन पावलानं श्री ज्येष्ठा गौरी आल्या घरोघरी... - AKOLA TIMES

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

error: Content is protected !!