Screenshot 2021 09 15 18 12 51 57 AKOLA TIMES

प्रवीण दरेकरांच्या बेताल वक्तव्याचा निषेधार्थ जोडे मारो आंदोलन !

रा.काँ पक्षाच्या महिला महानगराध्यक्ष रिज़वाना शेख अजी़ज़ यांच्या नेतृत्वात “जोडे मारो आंदोलन” करण्यात आले

अकोला
प्रदेश अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांच्या सूचनेनुसार तसेच विदर्भ निरीक्षक वर्षा ताई निकम आणी जिल्हा निरीक्षक सोनाली ताई ठाकूर यांच्या मार्गदर्शनात विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेता प्रवीण दरेकर यांच्या विरोधात “जोडो मारो आंदोलन” करण्यात आले।

Screenshot 2021 09 15 18 12 51 57 AKOLA TIMES

प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा रंगलेल्या गालांचा मुका घेणारा पक्ष आहे.. अशी अतिशय खालच्या दर्जाची टीका केलेली आहे। प्रवीण दरेकरांच्या बेताल वक्तव्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला महानगराध्यक्षा रिज़वाना शेख अजी़ज़ यांच्या नेतृत्वात नवीन बस स्टँड समोर धिंग्रा चौक येथे प्रवीण दरेकरांच्या विरोधात घोषणा देत फोटोला जोडे मारून व चपलांचा हार घालून आंदोलन करण्यात आले।

यावेळी प्रदेश प्रवक्त्या महिला नेत्या डॉ.आशाताई मिरगे,महानगर जिल्हा उपाध्यक्षा मंदाताई देशमुख,महिला उपाध्यक्षा दिपा शेगोकार,महासचिव रूपाली जामने, वीजेएनटी महिला अध्यक्ष माधुरी गिरी, असंगठित कामगार सेल महिला अध्यक्ष अनीता दीघेकर,युवती अध्यक्षा मेघा बार्शी टाकली तालुका अध्यक्ष सुषमा ताई राठोड,श्रीकांत दादा पिसे पाटिल माजी जिलाध्यक्ष,
राजकुमार मूलचंदानी माजी महानगर अध्यक्ष,प्रदेश सदस्य विजय उजवणे, जावेद जकरिया राष्ट्रीय महासचिव अल्पसंख्यक विभाग, समीर खान,अजीज शेख सिकंदर,शेख चाँद,अबरार खान हे उपस्थित होते!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

error: Content is protected !!